MSRTC च्या बसमधून विनापरवानगी पार्सल नेल्यास चालक-वाहक होणार निलंबीत, हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर ST अधिक सतर्क

परवानगी शिवाय स्वतःहून कोणी पार्सल, कुरियर नेल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ST Bus (Photo Credits: Twitter)

राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) एस टी (ST Bus) बसमधून चालक किंवा वाहकांना विना परवानगी पार्सल, कुरियर घेऊन जाणं आता महागात पडणार आहे. परवानगी शिवाय स्वतःहून कोणी पार्सल, कुरियर नेल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी रायगडमध्ये पेण -आपटा बसमध्ये बॉम्ब (improvised explosive device) सापडला होता. त्याच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाने सुरक्षा कडक करत वाहक आणि चालकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. पेण - आपटा बसमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू आपडल्याने खळबळ, बॉम्बशोधक पथकाने निकामी केली वस्तू

अनेक एसटी चालक काही विशिष्ट रक्कम घेऊन त्यांच्या प्रवासाच्या मार्गावर पार्सल, कुरियर देण्याचं काम करतात. मात्र भविष्यात असे करणं चालक आणि वाहकांना महागात पडणार आहे. अशा चालक आणि वाहकांवर निलंबनाची देखील कारवाई होऊ शकते. कोकण, पनवेल अशा मार्गांवर हमखास मसाले, मासे, काही धान्य, कांदे, बटाटे पार्सल, कुरियरच्या स्वरूपात दिले जातात. या वस्तू चालक, वाहकाच्या सीटजवळ किंवा लगेजच्या ठिकाणी ठेवल्या जातात. त्यातुन मिळणारे पैसे चालक, वाहक विभागून घेतात. मात्र आता अशाप्रकारे ने-आण करण्याची परवानगी नाही. Blast in Thane: काशिमिरा परिसरात सौम्य स्वरूपाचा ब्लास्ट, स्फोटक भरलेला प्लॅस्टिक बॉल फेकल्याचा बाइकर्सचा दावा

सीआरपीएफच्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईमध्ये लोकल सेवा, गर्दीची ठिकाणं हे दहशतवाद्यांचं लक्ष्य असण्याची शक्यता आहे. 14 फेब्रुवारी दिवशी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनेने भारतीय सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान ठार झाले. त्यानंतर काश्मिरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन झाले. यामध्ये तीन दहशतवादी ठार करण्यात भारताला यश आलं. जम्मू काश्मिर मधील या हल्ल्यानंतर सध्या देशभरामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.