MSC Bank Scam: आमदार रोहित पवार यांच्या Baramati Agro वर ED ची धाड; 6 कार्यालयात कारवाई

आज सकाळपासूनच बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून (ED) छापेमारी सुरू आहे.

Rohit Pawar | Twitter

बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) या आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या कंपनीवर आज (5 जानेवारी) ईडी ने धाड टाकली आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी हा छापेमारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आज सकाळपासूनच बारामती अॅग्रोच्या सहा कार्यालयावर ईडीकडून (ED) छापेमारी सुरू आहे. दरम्यान मागील वर्षी रोहित पवार यांना त्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाई दरम्यान कंपनीत कुणालाही प्रवेश देण्यात आलेला नाही.

रोहित पवार यांनी x वर 'अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल...' असं सूचक ट्वीट आज सकाळी केलं आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी (MSC) बँकेशी झालेल्या फसवणुकीशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या चौकशीत ही कारवाई केली आहे. 

पहा ट्वीट

एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार शरद पवारांसोबत कायम दिसून आले आहेत. त्यांनी अजित पवारांवर थेट टीका करण्याचं टाळलं आहे. मात्र सरकार वर ताशेरे ओढले आहेत. मागील काही महिन्यांपासून रोहित पवार युवकांचे प्रश्न घेऊन आक्रमक झाले होते. यंदा ते दिवाळीतही पवार कुटुंबासोबत बारामती मध्ये दिसले नाही. त्यांच्या कुटुंबाने शेतकरी, कष्टकरी यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. नुकत्याच झालेल्या पक्षाच्या शिबिरालाही ते अनुपस्थित होते.ते परदेशात होते.