Maharashtra Board 12th Result Date: 12 वीचा निकाल तारीख जाहीर, 28 मेला दुपारी 1 वाजता mahresult.nic.in वर लागणार

आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 28 मे दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे.

Results 2019

12th Std Results Date: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या (28 मे) दिवशी जाहीर होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थी त्यांच्या परीक्षा निकालाच्या तारखेची वाट पाहत होते. आज मंडळाकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार 28 मे दिवशी दुपारी एक वाजता हा निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. मंडळाच्या अधिकृत वेबसाईट सोबत थर्ड पार्टी वेबसाईट्सवरही विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. Maharashtra Board SSC HSC Results 2019: 12,10 वीचा निकाल लवकरच; मेडिकल, इंजिनियरिंग ते FYJC अ‍ॅडमिशन साठी राखीव कोट्यात आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी ही 5 सरकारी कागदपत्र ठेवा तयार

कसा पहाल 12 वीचा निकाल?

महाराष्ट्र बोर्डचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट्स

mahresult.nic.in,

maharashtraeducation.com, results.mkcl.org,

mahahsscboard.maharashtra.gov.in,

mahahsscboard.in

Maharashtra Board HSC Result 2019: मोबाईलवर SMS च्या माध्यामातून कसा पहाल 12 वीचा निकाल?

मागील वर्षी बारावीचा निकाल 30 मे 2018 दिवशी लागला होता. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च दरम्यान पार पडली आहे. बारावी पाठोपाठ दहावीचे निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.