MPSC 2020 च्या परीक्षांमध्ये 'EWS'चा पर्याय निवडण्यासाठी 22 जानेवरीपर्यंत मुदतवाढ; पहा mpsc.gov.in वर कसा कराल हा बदल स्टेप बाय स्टेप
त्यानुसार उमेदवार 22 जानेवारी पर्यंत हे बदल करू शकणार आहेत.
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणर्या पदभरती परीक्षांमध्ये 'SEBC' प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्ल्यूएस पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार उमेदवारांना 15 जानेवारीपर्यंत 'एमपीएससी'च्या (MPSC) ऑनलाइन प्रणालीद्वारे पर्यायात बदल करायचा आहे, अशी माहिती 'एमपीएससी'कडून दिली होती त्याला आता मुदत वाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी 22 जानेवारी पर्यंत हे बदल करू शकतात. त्यानंतर वेब लिंक बंद होणार आहे. MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक.
सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०, राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० या परीक्षेसाठी अर्ज केलेल्यांना हे बदल सध्या करण्याची मुभा देण्यात आली आहे. इथे पहा अधिकृत परित्रक.
कसा कराल ऑनलाईन बदल
- सर्वात प्रथम ऑनलाईन लॉगिंग करा. त्यानंतर माझं खातं पर्याय निवडा.
- माझे अॅप्लिकेशन मध्ये स्पर्धात्मक परीक्षा हा पर्याय निवडा.
- जाहिरातीचं वर्ष निवडल्यानंतर तुमच्या परीक्षेची निवड करा.
- त्या परीक्षेतील 'सिलेक्ट कॅटेगरी' वर क्लिक करा.
- अराखीव (खुला) किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक याची निवड करा.
दरम्यान हा बदल 'SEBC' प्रवर्गातील उमेदवारांसाठी असणार आहे. सध्या त्यांच्या आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आगामी परीक्षेच्या वेळेस त्यांच्या विचार खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एका वर्गातून केला जाऊ शकतो. आता 25 जानेवारी पासून मराठा आरक्षणाच्या प्रकरणाची अंतिम सुनावणी कोर्टात सुरू होणार आहे. सध्याच्या निर्णयांनुसार, वर्षभरासाठी मराठा आरक्षण नोकरी आणि शिक्षणामधून स्थगित करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.