डान्स बार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे छोटा पेग्विंन खुश असणार -निलेश राणे
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी डान्स बारवरुन वादग्रस्त विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
सुप्रीम कोर्ट (Supreme Court) ने गुरुवारी (17 जानेवारी) डान्स बार (Dance Bar) बाबत राखून ठेवलेला मोठा निर्णय दिला. यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईत छमछम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच डान्स बारवरील जाचक अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी डान्स बारवरुन वादग्रस्त विधान करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तर मुंबईत नाईट लाईफ (Night Life) सुरु होण्याच्या मागणीमुळे छोटा पेंग्विन खुश झाला असेल असे ट्वीट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नीलेश राणे यांनी सातत्याने शिवसेना (Shivsena) पक्षावर निशाणा साधला आहे. त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) मृत्यूसंदर्भात आणि सोनु निगम (Sonu Nigam) याचा काय संबंध आहे यावरुन मुद्दा उचलून धरला होता. मात्र ताज्या घडामोडीवर भाष्य करताना काल सुप्रीम कोर्टाने डान्स बारवरील निर्णयामुळे आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. परंतु आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे छोटा पेंग्विंन खुप खूश असणार असे म्हटले आहे. (हेही वाचा-मुंबईत पुन्हा एकदा छमछम वाजणार, डान्सबारवरील जाचक अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द )
आदित्य ठाकरे यांनी मुंबईत नाईट लाईफला परवानगी देण्यात यावी असा पाठपुरावा सरकारकडे केला होता. तर मुंबई ही रात्रभर जागी असल्याने उद्योग आणि सेवाक्षेत्र अधिक विकसित होत आहे. तसेच शहराचे राहणीमान बदलत असल्याने या पद्धतीची सुधारणा व्हावी असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.