Amaravati Shocker: दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईची हत्या, दारूड्या मुलाला अटक, धारणी तालुक्यातील खळबळजनक घटना
अमरावती जिल्ह्यात दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Amaravati Shocker: अमरावती जिल्ह्यात दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील चौकशी आणि कारवाई सुरु आहे. (हेही वाचा- स्पॅनिश महिला पर्यटकावर सामुहिक बलात्कार, तिघांवर गुन्हा दाखल,
मिळालेल्या माहितीनुसार, पवन जांबेकर असं आरोपी मुलाचे नाव आहे. तर गंगाबाई मोतीलाल जांबेवर असं हत्या झालेल्या आईचे नाव आहे. गंगाबाई यांच्या बॅंकेच्या खात्याच पी एम किसान सन्मान योजनेचे पैसे आले ही माहिती मुलगा पवनला कळताच त्याने आईकडून पैसे मागण्यास सुरु केला. आई पैसे देत नसल्यामुळे मुलाने छळ करण्यास सुरु केला. दारूसाठी पैसे हवेत म्हणून आईला छळ होता. आईकडे पैसे असून ती पैसे देत नाही याचा राग मनात धरत मुलाने आईला काठीने मारहाण केली.
बेदम मारहाणीत गंगाबाई यांचा जीव कासाबीस झाला. गंभीर जखम झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ माजली. पोलिसांनी गावात चौकशी केली तर पवन याने आपल्या आईची हत्या केली असं सांगण्यात आले. सतत आईशी दारूच्या पैशांसाठी वाद घालत असल्याचे गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पवनवर गुन्हा दाखल केला आणि त्याला राहत्या गावातून अटक करण्यात आले.पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहे.