पुणे: आझम कॅम्पस मध्ये मशिदीचं रूपांतर क्वारंटीन सेंटर मध्ये!
सुमारे 9 हजार स्क्वेअर फीट हॉलमध्ये मशिदीच्या पहिल्या मजल्यावर 80 बेड्स उभारण्यात आले आहेत.
पुण्यामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता आता आझम कॅम्पस मधील शैक्षणिक संस्थेचे रूपांतर क्वारंटीन सेंटरमध्ये करण्यात आलं आहे. कोरोनाच्या संशयित रूग्णांना येथे ठेवण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. सुमारे 9 हजार स्क्वेअर फीट हॉलमध्ये मशिदीच्या पहिल्या मजल्यावर 80 बेड्स उभारण्यात आले आहेत. दरम्यान MCES चे चेअरमन पी. ए इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'देश संकटात असताना आम्ही मदतीचा हात पुढे करणं हे आमचं कर्तव्य आहे'. महाराष्ट्रात सद्य स्थितीत Coronavirus बाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर.
HT ला इनामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही मशिदीच्या पहिल्या मजल्यावर बेड्सशी सोय केली आहे. सोबतच इथे येणार्या रूग्णांना अन्न-पाणी पुरवण्याची व्यवस्थादेखील आमच्याकडून केली जाईल. सध्या क्वारंटीन सेंटरला आवश्यक असणार्या अन्न पाणी, शौचालयाची सुविधा, वीज, फॅन सह अत्यावश्यक सुविधांनी आम्ही सज्ज आहोत. दरम्यान या मशिदीसोबतच मल्टी स्पेशॅलिटी युनानी हॉस्पिटलची देखील जागा क्वारंटीन सेंटरसाठी गरज असल्यास वापरता येऊ शकते. सध्या या आझम कॅम्पस जवळ असलेल्या भवानी पेठ आणि नाना पेठ या वस्तींमध्ये पुण्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.
ANI Tweet
दरम्यान आझम कॅम्पस मॅनेजमेंट कडून 25 लाख रूपयांचा किराणामाल गरजुंना देण्यात आला आहे. तर त्यांच्याकडून 5 रूग्णवाहिका स्टाफ सह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान कोंढवा मध्ये 25 डॉक्टरांची टीमदेखील सज्ज आहे.