Maharashtra Weather Forecast: राज्यात चार दिवस पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात चिंता मिटण्याची शक्यता आहे.

Mumbai Rainfall (PC- ANI)

राज्यात पुढील (Maharashtra Weather)  चार दिवस पावसाचा अंदाज  (Weather forecast)  हवामान खात्याने वर्तवल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जाही करण्यात आला आहे.  मुंबई, पुण्यात पावसाने पुन्हा पुनरागमन केल्याने शहरातील उका़डा काही प्रमाणात कमी झाला आहे. मुंबईतील (Monsoon update)अनेक भागात पाऊस पडला तर पुणे आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. शिवाय लोणावळ्यातदेखील पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पुढील चार दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यामुळे शेतकऱ्यांची काही प्रमाणात चिंता मिटण्याची शक्यता आहे.  (हेही वाचा - Mumbai Cleaning Inspection: मुंबईमधील अस्वच्छतेबाबत CM Eknath Shinde आक्रमक; रस्त्यांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी दररोज दोन तास घालवण्याचे BMC चे अधिकाऱ्यांना निर्देश)

पाहा पोस्ट -

विदर्भ आणि मराठवाड्यात 4 सप्टेंबरनंतर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे संपूर्ण राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 3 आणि 4 सप्टेंबरला मध्यमहाराष्ट्रात आणि 4, 5 सप्टेंबरला मराठवाड्यात तर 5, 6 सप्टेंबरला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.