Monsoon Update: मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, हवामान खात्याकडून रायगड जिल्ह्यात हायअलर्ट जाहीर
तसेच 9-13 जून दरम्यान मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता.
Monsoon Update: मुंबई आणि रायगड मध्ये हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच 9-13 जून दरम्यान मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दुसऱ्या बाजूला रायगड जिल्ह्यात सुद्धा पावसाला सुरुवात झाली असून हायअलर्ट जाहीर केला आहे. येत्या 10-11 जून रोजी रायगडमध्ये वेगाने वारे वाहण्यास तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर काम असेल तरच जावे असे सांगण्यात आले आहे. त्याचसोबत रस्त्यांवरुन गाडी चालवताना सावधगिरी बाळगावी अशा ही सुचना दिल्या आहेत.
हवामान खात्याने पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 10 जून पासून मुसळधार पावसाचा अंदाज लावण्यात आला आहे. याच कारणास्तव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून राज्य प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी प्रशासनाला सखल भाग, भूस्खलन होणाऱ्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देशन दिले आहेत.(Mumbai Monsoon Update: मुंबईत प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदा 10 जून पूर्वीच मान्सून दाखल-IMD)
Tweet:
Tweet:
मुख्यमंत्र्यांनी संरक्षण मंत्र्यांना जिल्ह्यातील एमडीआरएफ सोबत बैठक करण्यास सांगितले. मुंबई उपनगर आणि कोकण क्षेत्रात 9 ते 12 जून दरम्यान अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज आहे. अशातच सरकारने कोणताही दुर्घटना होऊ नये म्हणून आधीच तयारी केली आहे. मंगळवारी सकाळी सुद्धा मुंबईतील काही परिसरात पावसाचा जोरदार सरी कोसळल्याचे दिसून आले. सायन भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याचे ही समोर आले होते.