Monsoon Update: वरुणराजाचा सांगावा! केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याची शक्यता; महाराष्ट्रासाठी मुहूर्त कधी? IMD ने काय म्हटलं?

ही परिस्थीती अशीच राहिली आणि मान्सूनचा वेग कायम राहिला तर येत्या 10 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूचे आगमन होईल. हवामान विभागाने देशभरातील हवामानाचा अंदाज (India Weather Forecast) वर्तवला आहे.

Monsoon | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Monsoon Update: मोसमी पाऊस कधी येणार याकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना आनंदाची वार्ता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितनुसार केरळमध्ये मान्सून आज (4 जून) प्रवेश करेल. नैऋत्य मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात आणखी काही भागात पुढे सरकला आहे आणि IMD च्या अंदाजानुसार मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती आहे. ही परिस्थीती अशीच राहिली आणि मान्सूनचा वेग कायम राहिला तर येत्या 10 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूचे आगमन होईल. हवामान विभागाने देशभरातील हवामानाचा अंदाज (India Weather Forecast) वर्तवला आहे.

महाराष्ट्रात सध्या तापमान चांगलेच वाढल्याने उकाडा वाढला आहे. नागरिकांची उकाड्याने काहीली होत आहे. एका बाजूला उन्हाच्या झळ्या आणि दुसऱ्या बाजूला उकाडा. त्यामुळे नागरिकांची घामाने अंघोळ होत आहे. मान्सूनपूर्व पावसाने राज्यात काही ठिकाणी थंडावा मिळेल असे वाटते आहे. मात्र, तसे घडताना दिसत नाही. नाही म्हणायला अनेक ठिकाणी वातावरण ढगाळ होऊन काही ठिकाणी पावसांच्या हलक्या सरी बरसत आहेत. पण त्या केवळ नावाला. म्हणावा असा पाऊस अजून तरी पडताना दिसत नाही. (हेही वाचा, Cyclone Biparjoy Dates in Mumbai & Konkan: मुंबई आणि कोकणात चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तर राज्याच्या 'या' भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता, IMD चा इशारा)

IMD ने असा अंदाज वर्तवला आहे की महत्त्वपूर्ण नैऋत्य मान्सून 4 जूनच्या आसपास केरळमध्ये पोहोचेल. मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. साप्ताहिक बुलेटीनमध्ये हवामान विभागाने म्हटले होते की, शनिवार ते बुधवार (३ जून ते ७ जून) केरळ आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढे IMD ने असा इशारा देखील दिला आहे की वाऱ्याचा वेग 40-45 ते 55 किमी प्रतितास पर्यंत पोहोचेल आणि केरळ किनारपट्टीवर वादळी हवामान असेल आणि मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे.

ट्विट

हवामान विभागाने पुढे म्हटले आहे की, या व्यतिरिक्त, लक्षद्वीप, किनारपट्टी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक प्रदेशांमध्ये गडगडाटी वादळे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह हलक्या ते मध्यम सरी येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये या कालावधीत विखुरलेला पाऊस पडू शकतो.