Monsoon 2022 Updates: मान्सून मुंबईत दाखल, पावसाची दमदार सुरुवात; उर्वरीत महाराष्टातही लवकरच वरुनराजा बरसणार

मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून मुंबईपर्यंत धडक (Monsoon 2022 Enters in Mumbai) दिली आहे. मुंबईत प्रवेश केलेला मान्सून लवकरच महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत ट्विट केले आहे.

Mumbai Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मान्सून 2022 (Monsoon 2022) हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून मुंबईपर्यंत धडक (Monsoon 2022 Enters in Mumbai) दिली आहे. मुंबईत प्रवेश केलेला मान्सून लवकरच महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाने याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दक्षिण-पश्चिम मान्सून आज (11 जून 2022) रोजी मुंबईत पोहोचला आहे. हा मान्सून मध्य अरबी समुद्राच्या प्रमुख भागांमध्ये मुंबईसह कोकणात आणि महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. कर्नाटकच्या काही भागांमध्येही मान्सूनने दमदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

उत्तर अरबी महासागरातील काही भआगात खास करुन कोकण, गुजरातमधील काही भाग, मध्य महाराष्ट्रात आणि संपूर्ण कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगना, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्येही मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या पाच दिवसांमध्ये पूर्व भारत आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम आदी राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढच्या काही तासांमध्येच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि परिसराती मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल. यावेळी ढगांच्या गडगडाटासह विजांचाही कडकडाट होईल.

महाराष्ट्रात आज सकाळीच अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर कोसळली. हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकते. त्यामुळे मुंबई शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, इमारतींच्या छतावरील पत्रे उडणे यांसारख्या घटना घडू शकतात. (हेही वाचा, Monsoon 2022: आता फक्त काहीच तास उरले; पुढच्या दोन दिवसांमध्ये मान्सून कोकणात, उर्वरीत महाराष्ट्रात कधी?)

ट्विट

हवामान विभागाने पुढे असेही म्हटले आहे की, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर पश्चिम भारतातील इतर अनेक भागांमध्ये तापमान काही अंशी कमी होईल. परंतू, 15 जून पर्यंत कोणताही मोठा दिलासा तापमानात पाहायला मिळेल असे दिसत नाही. पुर्वेकडील थंड हवा 16 जूनपासून भीषण ग्रर्मीमुळे काहीसा दिलासा देऊ शकेल. 12 जून पासून पूर्व मध्यप्रदेश छत्तीसगढ आणि ओडीशामध्ये मान्सूनबाबत आगोदरच भविष्य वर्तविण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशमध्ये मात्र तापमान काहीसे अधिकच पाहायला मिळेल.