Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा-IMD
याबद्दल आयएमडी नागपूरचे डिप्युटी डिरेक्टर मोहन लाल साहू यांनी माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी सुद्धा हवामान खात्याने महाराष्ट्रात लँन्डफॉल झाल्याने पुढील 24 तासात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
यंदाच्या वर्षात जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर आता हवामान खात्याने पुढील 24 तासांच्या बाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याने असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील विदर्भात आणि मध्य प्रदेशातील काही भागात पुढील 24 तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याबद्दल आयएमडी नागपूरचे डिप्युटी डिरेक्टर मोहन लाल साहू यांनी माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी सुद्धा हवामान खात्याने महाराष्ट्रात लँन्डफॉल झाल्याने पुढील 24 तासात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
तसेच हवामान खात्याने शनिवारसाठी यल्लो अलर्ट जाहीर केला असून शहारासह ठाण्यातील काही भागात अतिवृष्टी होणार आहे. त्याचसोबत मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही भागात येत्या 14 जूनला तुफान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Monsoon 2020 Updates: महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन, पुढील 48 तास राज्यात पुढे सरकण्यास वातावरण अनुकूल; मुंबई हवामान खात्याची माहिती)
नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शहादा आणि तळोदा तालुक्यात अनेक घरांची पडझड झाली असून आठ ते दहा जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळच्या वादळी पावसामुळे या दोन्ही तालुक्यात 500 हून अधिक विजेचे पोल कोलमडले असून अनेक झाडे उन्मळून पडल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, शुक्रवारी हवामान खात्याने महाराष्ट्रातील मुंबईत, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ मधील काही भागात आणि दक्षिण गुजरात, दक्षिण मध्य प्रदेश, झारखंड आणि बिहार मधील काही क्षेत्रात 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोकण आणि गोवा मध्ये सुद्धा तुफान पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर मध्य प्रदेश मराठवाडा, आंध्र प्रदेशाच्या तटावर आणि उत्तर आंतरिक कर्नाटक, छत्तीसगढ, तेलंगणा, विदर्भ, आसाम आणि मेघालय येथए पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.