Molestation of Woman Passenger In BEST Bus: रिक्षा नंतर आता धावत्या बेस्ट बसमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार, 5 दिवसांनी आरोपी पोलीसांच्या अटकेत

प्रवास करताना लैंगिक अत्याचार केले.

Molestation | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

 Molestation of Woman Passenger In BEST Bus: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. दोन दिवसांपुर्वीच रिक्षा चालकाने तरुणीवर गोरेगाव येथे बलात्कार केल्याची घटना घडली. हे प्रकरण ताजे असतानच  मुंबईतील एका वकिल महिलावर धावत्या बेस्ट बसमध्ये लैंगिक छळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणातील आरोपी दादर येथील पोलीसांच्या ताब्यात आहे. मुंबईत बेस्ट बसमध्ये प्रवास करताना महिला वकिलांचा लैंगिक छळ केला. पीडित महिलेला कळताच सावध झाली आणि बसमध्ये आरडाओरड केली. दरम्यान आरोपीने बस मधून पळ काढला.

हे प्रकरण 4 जुलै रोजी सकाळी 10 च्या सुमारास बेस्ट बस क्रमांक 172 मध्ये घडल्याची वृत्त मिड डे ने दिले आहे.  बसमध्ये प्रवास करताना महिलेला आरोपीने गैरपध्दतीने मागून स्पर्श करत असल्याचं जाणवले. काहीतरी मागून टोचत असल्याचे समजल्यावर महिने सावध राहून बसमध्ये आरडोओरड केला दरम्यान सगळ्याचे लक्ष जाताच आरोपी बस मधून पळाला. महिलेने पटकन त्या आरोपीचा पळतानाचा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये शूट केला. या व्हिडिओच्या सहाय्याने पोलीसांनी आरोपीला शोधून काढले.

महिलेने दादर पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवली. व्हिडिओच्या सहाय्याने पोलीसांनी आरोपीला पकडले. आरोपीवर पोलीसांनी  कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलीसांनी व्हिडिओच्या मदतीने बसस्टॉपच्या फुटेज पाहिले. आरोपी वारंवार रस्ता बदलत होता असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. काही सेकंदच्या व्हिडिओतून आरोपीला पकडणं कठीण होतं. पण पोलीसांनी प्रयत्न चालू ठेवले अखेर 9 जुलै  रोजी पोलीसांनी ५ दिवसांनंतर आरोपीला अटक केले. नारायण मंहतो (38) असे या आरोपीचे नाव आहे.  सोमवारी त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.