रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत; जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीला भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
Cyclone Nisarga Update In Raigad: निसर्ग चक्रिवादळ (Cyclone Nisarga) रायगड (Raigad) जिल्ह्यात धडकले आहे. कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेगही वाढला आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) किनारपट्टीला भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत झाली आहे, अशी माहिती जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. मुंबईसह श्रीवर्धन, अलिबाग आणि सिंधुदुर्गा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परिघ 60 किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना वाऱ्यांचा वेग 100 किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीला धडकले असून मोठ्या प्रमाणात वारा सुटला आहे. रायगडमध्ये अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. शिवाय आकाशावर अधिराज्य गाजवणारी घार देखील या तडाख्यातून सुटली नाही. जवळपास 25 ते 30 घारी या पावसाच्या तडख्यामुळे जमिनीवर कोसळून पडल्या होत्या. तसेच या दरम्यान कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकल्यानंतर मुंबईतही वाऱ्याचा वेग वाढू लागला आहे. यामुळे दक्षता म्हणून वरळी-वांद्रे समुद्र सेतूवरचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालक माघारी फिरत असून पुढील सूचना येईपर्यंत सी-लिंक बंद असल्याची माहिती पोलीस अधिकऱ्यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Cyclone Nisarga Effect: निसर्ग चक्रीवादळ चा हाहाकार! रायगड मध्ये इमारती वरचे पत्रे उडून गेले (WATCH VIDEO)
एएनआयचे ट्वीट-
मुंबईच्या किनारपट्टीवर निसर्ग वादळ आदळण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे.