MNS On CM Uddhav Thackeray: आपणास धनुष्य बाणाचा विसर पडल्याचे म्हणत मनसेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी आपणास धनुष्य बाणाचा विसर पडल्याचे म्हटले आहे. खरंतर हे पत्र संदीप देशपांडे यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांची व्यस्था सांगण्यासाठी हे पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.

Sandeep Deshpande | (Photo Credit : Facebook)

MNS On CM Uddhav Thackeray:  मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात त्यांनी आपणास धनुष्य बाणाचा विसर पडल्याचे म्हटले आहे. खरंतर हे पत्र संदीप देशपांडे यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांची व्यस्था सांगण्यासाठी हे पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. संदीप देशपांडे यांनी हे पत्र त्यांच्या ट्विटवरुन ट्विट केले आहे.(Eknath Khadse: भोसरी एमआयडीसी जमीन व्यवहार प्रकरणी ईडीकडून नेते एकनाथ खडसेंची 5 कोंटींची मालमत्ता जप्त)

संदीप देशपांडे यांनी पत्रात असे म्हटले आहे की, प्रखर हिंदूत्वाचा पुरस्कार करत मा. बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केलीच शिवाय त्याला साजेस पक्षचिन्ह ही निर्माण केले. ते म्हणजे धनुष्यबाण. महाभारत ते रामायण काळापासून धनुष्यबाण हा दिंदू धर्मातील महत्वाचे प्रतिक आहे. परंतु आपला पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ता भोगत मग्न असल्यापासून हिंदूत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आता आपल्याला धनुष्यबाणाचा विसर पडलेला दिसतोय हे पाहून आता वेदना होतात.

यामागील कारण असे की, दादर मधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या परिसरात चालत असलेले धनुर्विद्या प्रशिक्षण अनेक वर्षापासून बंद आहे. हे प्रशिक्षण सुरु असताचा चुकून एक बाण महापौर बंगल्याच्या परिसरात पडला. यामध्ये कोणीही इजा झाली नाही. परंतु तरीही आपण हे धर्नुविद्या प्रशिण बंद करण्याचा आदेश कम फतवाच काढल्याचे समतेय.

धर्नुविद्या शिकरणारे खेळाडू आज निराशेत आहेत. त्यांना सराव करण्यासाठी जागा नाही. आपण आमदार आणि सभागृह नेत्यांना आर्चरी सरावासाठी जागा देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आर्चरी क्लबने स्थानिक आमदार, नगरसेविका आणि सभागृह नेत्या तसेच महापालिकेशी पत्रव्यवहार केला पण त्याला केराची टोपली दाखवण्यात आली. ज्या धर्नुविद्येसाठी शिवसेना पक्ष प्रमुखाचे नाव ऐकवे जात नसेल तर शिवसेना आपल पक्ष चिन्ह धनुष्यबाण ठेवण्याचा नैतिक अधिकार आहे का?(अनिल परब यांना समर्थन देण्यासाठी शिवसैनिक सरसावले, मुंबईत लागले बॅनर्स)

का बाळासाहेबांची शिवसेना आता फक्त हवेतच बाण मारण्यास पटाईत आहे? असा सवाल खेळाडूंच्या मनात आहे. ही अवस्था जर खेळाडूंची होत असेल तर ऑलिंम्पिमध्ये भारताला पारितोषक कसे मिळणार? जे खेळाडूंचे प्रशिक्षण बंद पाडून खच्चीकरण करतायत त्यांना ऑलिंम्पिकमधील  खेळाडुंना तोंड वर करुन शुभेच्छा देण्याचा कोणता अधिकार आहे?  ज्या प्रमाणे कॉमनवेल्थ गेम्समध्ये काँग्रेसने भ्रष्टाचार केला होता कदाचित आघाडीत जाऊन शिवसेनेही  हाच तर कॉमन मिनिमन प्रोग्राम आखला नाही?  असा प्रश्न क्रिडा प्रेमींना आणि धर्नुविद्या चाहत्यांना पडला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now