अजित पवार - शरद पवार यांच्या राजकीय खेळीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांचं मजेशीर ट्वीट
संदिप देशपांडे यांच्या ट्विटनुसार, हा हा गेम केवळ अजित पवारांचा नसून या घटनेचा खरा सूत्रधार कोणी दुसराच आहे असे सांगत ट्विटच्या माध्यमातून मनसे स्टाईलने टिका केली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेत झालेल्या खळबळजनक बदलावर आता सर्वच विरोधक आपले मत मांडू लागले आहेत. सत्ता स्थापनेच्या या खेळावर विरोधक आपले मत मांडून आपला राग व्यक्त करत आहेत. त्यात मग मनसे पक्ष तरी कसा काय मागे राहील. ज्या पक्षाचा एकच आमदार निवडून आला म्हणून टीका करणा-यांची बोलती बंद करत आत मनसैनिक सत्तास्थापनेच्या या खेळावर चांगलेच हात साफ करुन घेत आहेत. त्यातच आता मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) याrनी उडी टाकत मजेशीर पण खोचक टिका केले आहे.
संदीप देशपांडे यांच्या ट्विटनुसार, हा हा गेम केवळ अजित पवारांचा नसून या घटनेचा खरा सूत्रधार कोणी दुसराच आहे असे सांगत ट्विटच्या माध्यमातून मनसे स्टाईलने टिका केली आहे.
पाहा हे मजेशीर ट्विट:
हेदेखील वाचा- दीड तासांच्या चर्चेनंतर छगन भुजबळ परतले; अजित पवारांचा घरवापसीवर 'सस्पेन्स' कायम
या ट्विटनंतर नेटक-यांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. यात काहींना त्यांचे हे बोलणे पटले तर काहींनी इतरांच्या घरात झाकून बघण्यापेक्षा स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या असा सल्ला देखील संदीप देशपांडे यांना दिला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र यावर अजून तरी कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
महाराष्ट्रामध्ये सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना आज महाराष्ट्राचे सारे लक्ष सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाकडे लागले आहे. शनिवार (23 नोव्हेंबर) दिवशी सकाळी 8च्या सुमारास राष्ट्रपती राजवट हटवत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडला. आता 30 नोव्हेंबर पूर्वी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. मात्र त्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.