मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी औरंगाबाद दौऱ्यावर

तसेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. निवडणूक लढवण्यापूर्वी तिथीनुसार मनसेकडून शिवजयंती साजरी केली जाणार आहे.

Raj Thackeray (Photo Credits: Twitter/ ANI)

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दोन दिवस औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. निवडणूक लढवण्यापूर्वी तिथीनुसार मनसेकडून शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्याचसोबत औरंगाबादचे (Aurangabad) नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा मनसेकडून उपस्थित करण्यात आला होता. त्याचसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तारखेनुसार 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली. पण आता तिथीनुसार मनसे शिवजयंती साजरी करत शिवसेनेला शह देण्याची खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अभिजित पानसे यांच्याशी संवाद साधला. पानसे यांनी असे म्हटले आहे की, 12 मार्चला औरंगाबाद येथे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून राज ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती असणार आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ही पानसे यांनी स्पष्ट केले होते. तर औरंबाद आणि नवी मुंबईतील महापालिका निवडणूकीसाठी तयारी करण्याचे आदेश सुद्धा राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आले होते. (मनसे शॅडो कॅबिनेट वरील शिवसेनेच्या टीकेला संदीप देशपांडे यांच्याकडून प्रत्युत्तर)

तर मनसेनेने त्यांच्या पक्षाच्या झेंड्यात बदल केल्यानंतर आक्रमक भुमिका घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सरकारच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी मनसेच्या 14 व्या वर्धापनादिवशी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. त्यानुसार शॅडो कॅबिनेट मधील मंडळी सरकारच्या मंत्र्यांच्या कामावर लक्ष ठेवणार आहेत. तसेच देशभरात सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरुन सुद्धा राज ठाकरे यांनी मुंबईत एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते.