राज ठाकरे यांनी हिंदीतून केली उत्तर भारतीयांनीच कानउघडणी म्हणाले 'तुमचा स्वाभीमान कुठे आहे? '

व्यासपिठावर येताच मेरे भाईयों और बहनो... म्हणत राज यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. संपूर्ण भाषणच हिंदीतून केल्यामुळे उत्तर भारतीयांची नस राज ठाकरेंनी अचूक पकडली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

तुमच्या राज्यातील नेते काही काम करत नाहीत. कोणताही औद्योगिक उद्योग आणत नाहीत. त्यामुळे स्थानिकांना रोजगार निर्माण होत नाही. मग तुम्ही इतर राज्यांमध्ये रोजगार शोधायला येता. राजगारासाठी प्रत्येक वेळी अन्य राज्यात जावे लागल्याने तुम्हाला अपमानित झाल्यासारखे वाटंत नाही? तुमचा स्वाभीमान कुठे आहे? अशा स्पष्ट शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी उत्तर भारतीयांची कानउघडणी केली. कांदिवली येथे पार पडलेल्या उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात ते रविवारी (2 डिसेंबर) बोलत होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसेने केलेल्या विविध आंदोलनांवर होणाऱ्या टीकेपासून ते भूमिपूत्र, रोजगार, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर भूमिका मांडली. राज यांचे आजचे भाषण हे सर्व हिशोब चुकता केला काहीसे अशाच शैलीचे झाले, अशी चर्चा त्यांचे भाषण संपल्यावर उपस्थितांमध्ये होती. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी जाहीर व्यासपिठावरून प्रथमच भाषण केले.

उत्तर भारतीय महापंचायत समितीने (Uttar Bhartiya Manch) या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. व्यासपिठावर येताच मेरे भाईयों और बहनो... म्हणत राज यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली. संपूर्ण भाषणच हिंदीतून केल्यामुळे उत्तर भारतीयांची नस राज ठाकरेंनी अचूक पकडली. दरम्यान, आपल्या खास शैलीत त्यांनी आपली भूमिका मांडलीच. परंतु, त्याचसोबत उत्तर भारतीयांची कानउघडणीही केली. माझ्या भूमिका, पक्ष आणि आंदोलने यांमुळे उत्तर भारतीयांच्या मनात गैरसमज आहे. तो गैरसमजच दूर करण्यासाठी मी येथे आलो आहे. कोणतंही स्पष्टीकरण देण्यासाठी नाही, असे भाषणाच्या सुरुवातीलाच राज यांनी स्पष्ट केले. (हेही वाचा, राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर; निमंत्रणाचा स्वीकार, भूमिकेबाबत उत्सुकता)

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

....म्हणून परप्रांतीयांना कल्याण येथे मारहाण

कल्याण येथे रेल्वे नोकरभरतीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांना काही वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीबाबतही राज यांनी स्पष्ठ भाषेत भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या. आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही चिडला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का ? उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का ? असा सवालही राज ठाकरे यांनी या वेळी विचारला. दरम्यान, राज ठाकरे यांचे व्यासपिठावर आगमन झाले, तेव्हा त्यांचे मंत्रोच्चाराने स्वागत करण्यात आले.