MNS चा 22 ऑगस्टचा 'ठाणे बंद' रद्द; राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळण्याचं आदेश
या पार्श्वभूमीवर काल (20 ऑगस्ट) ठाणे मनसे कडून 22 ऑगस्टला 'ठाणे बंद' चं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा राज ठाकरे यांनी लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळा हे आवाहन केल्यानंतर बंद मागे घेतल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना ईडी कडून आलेल्या नोटीशीनंतर महाराष्ट्रभर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या 22 ऑगस्ट दिवशी त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहून नोटीशीला उत्तर द्यायचं आहे. या पार्श्वभूमीवर काल (20 ऑगस्ट) ठाणे मनसे कडून 22 ऑगस्टला 'ठाणे बंद' चं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र रात्री उशिरा राज ठाकरे यांनी लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळा हे आवाहन केल्यानंतर बंद मागे घेतल्याची माहिती अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी दिली आहे. .(कोहिनुर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस, भाजपच्या 'हिटलरशाही' विरोधात आवाज उठवणार संदिप देशपांडे यांची प्रतिक्रिया)
कोहीनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून रविवारी रात्री नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्येही चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. ठाण्यात नागरिकांना 22 ऑगस्ट दिवशी गरज असेल तरच बाहेर पडा. बंदाला प्रतिसाद न दिल्यास कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल अशा प्रकारची माहिती देत ठाणे बंद चं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र आता हा बंदमागे घेतल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.
ANI Tweet
राज ठाकरे यांच्यासोबतच मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांना देखील कोहिनुर मिल प्रकरणी नोटीस देण्यास आली आहे. शिवसेना भवन समोर असलेल्या कोहिनुर मिल क्रमांक 3 च्या जागेवरील काही भागाचा लिलाव करण्यात आला होता. 421 कोटींना या जागेचा लिलाव झाला. लिलाव केल्यानंतर ही जागा मनोहर जोशी यांच्या मुलाने घेतली. यामध्ये राज ठाकरे, राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश हे तिघे समान भागीदार होते. या मिलच्या जागेची खरेदी करताना उन्मेश याने आयएल अॅण्ड एफएलस सोबत घेतले होते.