MLC Elections 2022: राज्यात विधानपरिषद बिनविरोध की निवडणूक लागणार? आज फैसला

राज्यसभेसाठी भाजपने मैदानात उतरवलेला अतिरिक्त उमेदवार आणि त्याचा झालेला विजय यामुळे महाविकासआघाडीला धक्का बसला आहे.

Maharashtra Legislature | (Archived images)

Vidhan Parishad Elections 2022: राज्यसभा नवडणुकीपाठोपाठ राज्यात लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Elections 2022) काय घडते याबाबत राजकीय वर्तुळात कमालिची उत्सुकता आहे. राज्यसभेसाठी भाजपने मैदानात उतरवलेला अतिरिक्त उमेदवार आणि त्याचा झालेला विजय यामुळे महाविकासआघाडीला धक्का बसला आहे. आता विधानसभा निवडणुकीतही भाजपने अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सावध पावले टाकत आहे. महत्त्वाचे म्हणजे ही निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकासआघाडी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान, भाजप त्यावर काय निर्णय घेते यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे.

विधानसभा निवणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज (13 जून) संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याबाबत आजच फैसला होणार आहे. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी भाजपचे पाच, शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP), काँग्रेसचे (Congress) प्रत्येकी दोन तर एक भाजपपुरस्कृत अपक्ष असे 12 उमेदवार रिंगणात आहेत. (हेही वाचा, MLC Election 2022: पंकजा मुंडे यांना भाजपने विधानपरिषद नाकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी; चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्याकडून डॅमेज कंट्रोलसाठी प्रतिक्रिया)

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमीच आहे. पण तसे घडले तर सर्वच राजकीय पक्षांचा आणि निवडणूक यंत्रणेवरचा ताण बराचसा कमी होणार आहे. दुसऱ्या बाजूला जर निवडणूक लागली तर मात्र ती चुरशीची होणार आहे. एकेका मताने ही निवडणूक उत्कंटा वाढवेन. या निवडणुकीत घोडेबाजारालाही चांगेलच उधान येईल, असे बोलले जात आहे.

विधान परिषदेसाठी रिंगणात उतरलेले उमेदवार

शिवसेना- (Vidhan Parishad Shiv Sena Candidate)

सचिन अहिर (Sachin Ahir), आमश्या पाडवी (Aamshya Padvi)

राष्ट्रवादी- (NCP Vidhan Parishad Candidate)

एकनाथ खडसे (Eknath Khadse), रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar)

काँग्रेस- (Vidhan Parishad Congress Candidate)

भाई जगताप (Bhai Jagtap), चंद्रकांत हंडोरे (Chandrant Handore)

भाजप (Vidhan Parishad BJP Candidate)

प्रवीण दरेकर (Pravin Darekar), उमा खापरे (Uma Khapre), श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiy), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. हे दोन आमदार म्हणजे एक राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि दुसरे म्हणजे मंत्री नवाब मलिक. या दोघांनाही मतदानाची परवानगी मिळाली नाही. आता विधानसभा निवडणुकीत तरी किमान या दोघांना मतदानासाठी परवानगी मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे.