MLC Election 2022: शिवसनेकडून सचिन अहिर, आमशा पाडवी यांना संधी, सुभाष देसाई, दिवाकर रावते मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता

शिवसेनेने विधानपरिषेदसाठी मुंबईतून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि नंदुरबार येथील कट्टर शिवसैनिक व जिल्हाप्रमुख असलेल्या आमशा पडवी (Amsha Padvi) यांना संधी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. पडवी आणि अहीर यांना विधापरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु करा असे आदेश गेल्याचे समजते.

Sachin Ahir, Amsha Padvi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात विधानपरिषद निवडणूक (MLC Election 2022) लागली आहे. त्यामुळे रिक्त होत असलेल्या विधानपरिषदेच्या जागेवर राजकीय पक्षा आपापल्या कोट्यातून उमेदवार देत आहेत. सहाजिकच शिवसेनेनेही आपले उमेदवार देण्याची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, राज्यसभेप्रमाणे शिवसेना (Shiv Sena) विधानपरिषदेतही काहीसे धक्कातंत्र वापरत असल्याचे दिसते. शिवसेनेने विधानपरिषेदसाठी मुंबईतून सचिन अहिर (Sachin Ahir) आणि नंदुरबार येथील कट्टर शिवसैनिक व जिल्हाप्रमुख असलेल्या आमशा पडवी (Amsha Padvi) यांना संधी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे. पडवी आणि अहीर यांना विधापरिषदेसाठी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु करा असे आदेश गेल्याचे समजते. राज्यसभा निवडणुकीसाठीही शिवसेनेने कोल्हापूर येथून जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी दिली आहे.

शिवसेना या वेळी काहीशी खांदेपालट करण्याच्या विचारात असून जुन्या जाणत्या आणि ज्येष्ठांना काहीशी विश्रांती देऊन नव्या दमाच्या नेतृत्वास संधी देण्याच्या विचारात आहे. त्यामुळे सुभाष देसाई (Subhash Desai), दिवाकर रावते यांच्यासारख्या मंडळींचा विचार विधानपरिषदेसाठी केला नसल्याचे समजते. लवकरच मंत्रिमंडळातही बरेचसे फेरबदल केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (हेही वाचा, RS Elections 2022: शिवसेनेच्या संजय राऊत, संजय पवार यांच्याकडून विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल; शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह महाविकास आघाडीतील बडे नेते उपस्थित)

निवृत्त होणारे सदस्य

भाजप: प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे,  रामनिवास सत्यनारायण सिंह (दिवंगत)

शिवसेना: सुभाष देसाई, दिवाकर रावते

राष्ट्रवादी कॉंग्रेस: रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 9 जून

उमेदवारी अर्ज छाननी : 10 जून

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस: 13 जून

मतदान : 20 जून

मतमोजणी: 20 जून, सायंकाळी 05 वाजता

विधानपरिषदेसाठी 20 जून रोजी निवडणूक पार पडत आहे. ही निवडणूक 10 जागांसाठी पार पडणार आहे. म्हणजेच विधानपरिषदेतून निवृत्त होत असलेल्या 10 जगांवर नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. अर्थात राजकीय पक्ष 10 जागांवर नवे चेहरे देतात की काही जुन्या चेहऱ्यांनाच नव्याने संधी देतात याबाबत उत्सुकता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif