राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेच्या एका प्रतिनिधीला ट्रस्टी म्हणून स्थान द्यावे' आमदार प्रताप सरनाईक यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
राम मंदिर आंदोलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे योगदान पाहता शिवसेनेला राम मंदिर ट्रस्टमध्ये स्थान द्यावे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे.
राम मंदिर आंदोलनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे योगदान पाहता शिवसेनेला राम मंदिर ट्रस्टमध्ये स्थान द्यावे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) 100 वर्षेपण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya)आहेत. तसेच ते आज रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे, शिवसेनेने हिंदुत्वाची कास सोडली नसल्याचे अधोरेखित करण्यासाठी हा अयोध्या दौरा होत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, शिवसेनेकडून अयोध्येत जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रावर सत्ता स्थापन करुन 100 दिवस पूर्ण झाल्यामुळे उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. सहकुटुंब ते तेथे जाऊन रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. या दरम्यान, शिवसेना आमदार सरनाईक यांनी राम मंदिराबाबत वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष्य केंद्रीत करुन घेतले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या अंदोलनात मोलाचा वाटा उचलला होता. राम मंदिरासाठी त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामुळे राम मंदिराच्या ट्रस्टवर शिवसेनेला ट्रस्टी म्हणून स्थान द्यावे. एका जागेवर शिवसेनेच्या प्रतिनिधीची निवड करावी, अशी मगणी करत सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. तसेच यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय देतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. हे देखील वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून अयोध्या दौऱ्यासाठी रवाना
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या दोऱ्यापूर्वी मोठ्या संख्येने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. विशेष रेल्वे गाडीने शिवसैनिक अयोध्या पोहोचले आहेत. तसेच उत्तरप्रदेशमधील शिवसैनिक अयोध्या पोहचत आहेत.उद्धव ठाकरे यांनी आज रामलल्लांचे दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदी किनारी होणाऱ्या आरतीमध्ये सहभागी होतील, असेही म्हटले जात आहे.