सरकारी अधिकार्यावर चिखलफेक प्रकरणी नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर
नितेश राणेंसह 18 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सरकारी अधिकार्याला शिवीगाळ करत चिखलफेक करण्याच्या आरोपावरून अटकेत असलेले आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना सशर्त जामीन मंजूर झाला आहे. अरोसे न्यायालयाने आज (10 जुलै) जामीन मंजूर करताना आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी कणकवली पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी अशाप्रकारच्या अटी घातल्या आहेत. नितेश राणेंसह 18 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उप अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर नितेश राणे यांनी चिखलफेक केली होती. तसेच अर्वाच्च भाषेचा वापर करत स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेडेकरांना गडनदी पुलाला बांधले होते. या प्रकारानंतर नितेश राणे सह 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(अ), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नितेश राणे ची सरकारी कर्मचार्यावर चिखलफेक चूकीची; निषेध योग्य पण गैरकृत्याला पाठिंबा नाही : नारायण राणे यांची स्पष्टोक्ती
दरम्यान नितेश राणे यांचे वडील आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी नितेशने ज्या प्रकारे रस्त्याच्या दुर्दशेचा निषेध केला तो मार्ग चूकीचा असल्याचं म्हटलं आहे.