MLA Ashish Jaiswal Convoy Accident : आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचा अपघात; स्वीय सहाय्यकासह दोन जण जखमी

आमदार आशिष जैस्वाल यांच्या ताफ्याचा अपघात झाला असून अपघातात जैस्वाल यांच्या ताफ्यातील स्वीय सहाय्यकासह दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

Photo Credit - X

MLA Ashish Jaiswal Convoy Accident :आमदार आशिष जैस्वाल (MLA Ashish Jaiswal) यांच्या ताफ्याचाही भीषण अपघात (Convoy Accident) झाल्याची घटना घडली आहे. भंडाऱ्यापासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या कन्हान परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. कन्हानजवळ झालेल्या अपघातात जैस्वाल यांच्या ताफ्यातील स्वीय सहाय्यकासह दोन जण गंभीर जखमी (two injured) झाल्याचे समजते आहे. भंडाऱ्यात मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला. त्याच्या कारला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. रात्री झालेल्या अपघातातून सुखरूप बचावल्याचे त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले.  (हेही वाचा :Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या वाहनाला अपघात, काँग्रेस नेत्यांकडून गंभीर आरोप ) 

दरम्यान, नाना पटोले यांनी मंगळवारी रात्री उशिरा भंडारा जिल्ह्यात झालेल्या अपघातात त्यांना कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले. पटोले हे निवडणूक प्रचार आटोपून परतत असताना कारधा गावाजवळ त्यांचा अपघात झाला. सुदैवाने आपघातात कोणीही जखमी झाले नव्हते. मात्र, जैस्वाल यांच्या अपघातात त्यांच्या ताफ्यातील स्वीय सहाय्यकासह दोन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे.

अपघातानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडिओतून ट्रकने जाणूनबुजून त्यांच्या कारला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला, असे म्हटले. तथापि, नंतर दुसऱ्या निवेदनात, त्यांनी काळजी करण्याचे कारण नसून ट्रकने त्यांच्या कारची बाजू घासली गेल्याचं म्हटलं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif