Mission Begin Again in Maharashtra: ठाणे शहरात नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये सम विषम तारखेच्या धोरणानुसार पहा कोणत्या दिवशी कुठली दुकानं खुली राहतील याची संपूर्ण यादी!
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या सर्व अस्थापनांसाठी सम विषम तारखेच्या धोरणानुसार कधी कोणती दुकानं खुली राहतील याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर 24 मार्चपासून लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) जाहीर करण्यात आला आहे. आता देशासह राज्यात 30 जून पर्यंत लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू असला तरीही त्याचं स्वरूप वेगळं आहे. महाराष्ट्रात आता 'पुनश्च हरिओम' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिशन बिगिन अगेन सुरू आहे. यामध्ये आता सामान्यांच्या सोयीसाठी आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळावी म्हणून खबरदारीचे उपाय करत काही गोष्टी सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान यामध्ये मुंबई, ठाण्यासह राज्यभरात सम-विषम पद्धतीने दुकानं खुली ठेवण्याला सरकारने परवनगी दिली आहे. त्यानुसार ठाणे पालिका प्रशासनाने आता नागरिकांच्या सोयीसाठी काही दुकानांना परवानगी दिली आहे. त्यानुसार नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या सर्व अस्थापनांसाठी सम विषम तारखेच्या धोरणानुसार कधी कोणती दुकानं खुली राहतील याची माहिती देण्यात आली आहे. Unlock 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील; दुकानं, जीम, खाजगी कार्यालयं आणि शैक्षणिक संस्था यांसदर्भात नवी नियमावली जारी.
ठाण्यामध्ये राम मारूती रोड, तीन हात नाका, गोखले रोड, सुभाष पथक, जांभळी नाका, डॉ. आंबेडकर रोड या मार्गावरील दुकानं सम - विषम तारखांमध्ये विभागून आता खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मग पहा कधी कोणती दुकानं खुली राहू शकतात?
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये सम विषम तारखेच्या धोरणानुसार कधी कोणती दुकानं खुली राहतील?
Unlock 1: आजपासून 'या' गोष्टी झाल्या सुरु; पाहा कोणकोणत्या गोष्टींचा आहे समावेश - Watch Video
दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढता असला तरीही आता त्यावर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात आपण या जगतिक आरोग्य संकटाच्या टीपेला आहोत किंवा त्याच्या जवळपास आहोत असे संकेत काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबूक लाईव्ह मधून जनतेला संबोधित करताना म्हटले होते. त्यानुसार आता खबरदारी घेत व्यवहार सुरू करण्याला परवानगी दिली आहे. 3 जून दिवशी याला सुरूवात होणं अपेक्षित होतं मात्र निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय दोन दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.