मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये राडा; शिवसेनेच्या नगरसेवकांकडून स्थायी समितीच्या सभागृहाची तोडफोड
महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या दावनाच्या विषयाचा समावेश केल्याने हा वाद पेटला आहे. सरुवातीला या विषयावरुन शिवसेना-भाजप यांच्या नगसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. परंतु, काहीवेळाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या आमदाराला शिवीगाळ करत आक्रमक अशी भुमिका घेतली . एवढेच नव्हे तर, नगरसेवकांनी महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड देखील केली आहे.
मीरा-भाईंदर (Mira-Bhayander) महापालिकेत शिवसेना-भाजप (Shiv Sena- BJP) यांच्या नगरसेवकांमध्ये मोठा राडा झाला आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या दालनाच्या विषयाचा समावेश केल्याने हा वाद पेटला आहे. सुरुवातीला या विषयावरुन शिवसेना-भाजप यांच्या नगसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. परंतु, काहीवेळाने शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपच्या आमदाराला शिवीगाळ करत आक्रमक अशी भुमिका घेतली . एवढेच नव्हे तर, नगरसेवकांनी महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड देखील केली आहे.
मीरा-भाईंदर येथे मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत बाळासाहेब ठाकरे कला दालन आणि प्रमोद महाजन सभागृहाच्या विषयावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांकडून वारंवार केली जात होती. आज मंगळवारी या विषयावर योग्य निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा शिवसेनेकडून केली जात होती. याप्रमाणे आज स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार होती. हे देखील वाचा- Maharashtra Vidhan Sabha Election 2019: शिवसेना-भाजप युती, ठरुन मोडण्याची शक्यता; विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षाकडून स्वबळाची चाचपणी.
ट्विट-
परंतु, आजही कला दालनाचा विषय न मांडल्याने तसेच त्यावर कोणताही निर्णय न घेतल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीत गोंधळ घालण्यास सुरूवात केली. स्थानिक आमदार नरेंद्र मेहता हे या विषयात आडकाठी आणत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळी केला. त्यानंतर मेहता यांना शिवीगाळ करत शिवसेना नगरसेवकांनी स्थायी समिती सभागृह, महापौर कार्यालयात तोडफोड केली. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत सभा चालू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.