Thane Rape Case: लग्नाला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार, 21 वर्षीय आरोपीला अटक
तेवढ्यात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे.
Thane Rape Case: डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तेवढ्यात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले आहे. बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर झाली. एका शासकिय रुग्णालयात तीनं मुलाला जन्म दिला. याप्रकरणी तरुणाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (हेही वाचा- घरातला मुलगा संध्याकाळी 7 नंतर...'; कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणावर अभिनेता Siddharth Chandekar ने व्यक्त केला संताप (Watch Video)
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर गर्भवती झाली. १२ ऑगस्ट रोजी मुलीने ठाण्याचील सिव्हील रुग्णालयात मुलाला जन्म दिल्यानंंतर ही घटना उघडकीस आली. रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही घटना कारसवडवली पोलिस ठाण्यात दिली.पोलिसांनी या घटनेची चौकशीसाठी रुग्णालय गाठले.
अल्पवयीन मुलीची चौकशी केल्यानंतर आरोपीची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले. आरोपीला पालघर जिल्ह्यातील विक्रमगड येथील माळगाव पाड्यातून आरोपीला अटक केले. पोलिसांनी मंगळवारी भारतीय दंड संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.पोलिसांनी आरोपीची चौकशी केली त्यानंतर त्यांने सांगितले की, मुलीने लग्नाला नकार दिल्याने तीच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला.