Jalgaon Rape: संतापजनक! दूध आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली

दूध आणायला गलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली आहे.

Jalgaon Rape: संतापजनक! दूध आणायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; गर्भवती राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली
Representational Image (Photo Credits: Pixabay)

दूध आणायला गलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली. ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बलात्कार व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम (ज) अन्वये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बालकल्याण समितीने पीडितेचा जबाब नोंदवला असून याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कसून चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी नोव्हेंबर महिन्यात रात्री साडेनऊच्या सुमारास दुकानावर दूध आणायला गेली होती. पीडित व्यक्ती एकटीच असल्याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने तिला रस्त्यातच हेरले. त्यानंतर तिच तोंड दाबत तिला रस्त्याच्या कडेला घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. महत्वाचे म्हणजे, या घटनेनंतर पीडिता खूप घाबरली होती. यामुळे तिने या प्रकरणाची वाच्यता कुठेच केली नव्हती. मात्र, आता ती गर्भवती राहिल्याने या प्रकाराला वाचा फुटली हे देखील वाचा- Porn Film Shooting Racket In Mumbai: मुंबई क्राईम ब्रॅन्चच्या प्रॉपर्टी सेल कडून सुरत मध्ये 40 वर्षीय व्यक्तीला अटक; आतापर्यंत अभिनेत्री Gehana Vasisth सह 9 जणांना पोलिसांच्या बेड्या

दरम्यान, बुधवारी पीडिताने कौटुंबिक वादातून फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारदरम्यान ती 3 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पीडिताला जाब विचारला असता, तिने गेल्या तीन महिन्यांपूर्वी तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. यासंदर्भात न्युज 18 लोकमतने वृत्त दिली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 12, 2021 09:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).