युवासेना कार्यकर्त्याने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; स्थानिकांकडून मिळाला चोप
युवासेनेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असून स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे.
Young Girl Gets Molested By Yuvasena Worker: यवतमाळ शहरात नुकतीच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. युवासेनेच्या कार्यकर्त्याने एका अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला असून स्थानिकांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे.
यवतमाळ शहरातील आयुर्वेदिक कॉलेज चौकात आज ही घटना घडली. विनयभंग करण्याचा प्रयत्न करणारा युवासेनेचे कार्यकर्ता हा नेर तालुक्यातील उत्तरवाढोना येथील रहिवासी आहे. त्याच्याच गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे तर तो गेल्या 2 महिन्यांपासून या तरुणीचा पाठलाग करत होता असं देखील मुलीने सांगितलं आहे.
पीडितेने सांगितल्यानुसार तो वारंवार तिला फोन करुन भेटण्यासाठी आग्रह करत होता. काल ती आपल्या कॉलेजमध्ये परीक्षा देऊन गावाकडे जात होती. त्याचदरम्यान, त्याने तिला फोन करून भेटण्यासाठी जबरदरस्ती केली. तिला धमकावून आयुर्वेदिक कॉलेज चौकात बोलावले आणि आपल्या गाडीत बसून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
सेलिब्रिटी शेफचा मृतदेह घरातील किचनमध्ये आढळला; मृत्यूचं नेमकं कारण अद्यापही गूढ
लगेचच पीडितेने आरडाओरड सुरु केली. तिचा आवाज ऐकून नारीशक्ती समितीच्या कार्यकर्त्या तिथे धडकल्या आणि उपस्थित जमावासोबत त्यांनी युवासेनेच्या त्या कार्यकर्त्याला पकडून चोप दिला.
अखेर, त्या पीडितेची तिथून सुटका करण्यात आली व त्या कार्यकर्त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.