Amravati Accident: मिनी बस आणि ट्रकची धडक, अपघातात चौघांचा मृत्यू,अमरावतीतील घटना

सिमेंट कॉंक्रिट मिक्सर आणि मिनी बसच्या धडकेत अपघात झाल आहे.

Amaravati Accident PC TWitter

Amravati Accident:  अमरावतीमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिमेंट कॉंक्रिट मिक्सर आणि मिनी बसच्या धडकेत अपघात झाल आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतला आहे. अमरावतीतील नांदगाव- खंडेश्वर रोडवर हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. या भयवाह अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.  हेही वाचा- पिंपरी-चिंचवडमध्ये चालत्या कारच्या रुफवर बसून तरुणाचा धोकादायक स्टंट

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बस मध्ये यवतमाळ येथील क्रिकेट मॅच खेळण्यासाठी 14 तरुण अमरावतीहून निघाले होते. मिनी बस यवतमाळच्या दिशेने जात होती. वाटेतच नांदगाव -खंडेश्वरजवळ शिंंगणापूर जवळ हा अपघात झाला. मिनी बस आणि ट्रकची धडक लागली. ही धडक एवढी भीषण होती की, बसचा मागील भाग आणि ट्रकचा समोरील भागाची चेंगराचेंगरी झाली आहे. या अपघातात यवतामळ येथील 4 तरुणांचा मृत्यू झाला आणि 10 जण गंभीर जखमी झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच, जवळच्य गावातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमी तरुणांना नांदगाव खंजेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर बराच वेळ रस्त्यावर वाहतुकांची कोंडी झाली होती.