MIM Offers TO NCP: एमआयएमकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ऑफर, समिकरण जुळणार का? राज्याच्या राजकारणात नवी चर्चा

विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि असदुद्दीन औवैसी यांचा एमआयएम. होय, एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली आहे.

Imtiaz Jalil | (PC - Facebook)

राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरकस चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे ही चर्चा दोन भिन्न विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये आहे. हे पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) आणि असदुद्दीन औवैसी यांचा एमआयएम. होय, एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला ही ऑफर दिली आहे. स्वत: खासदार जलील (NCP) यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या भेटीत ही ऑफर दिल्याचेही जलील यांनी म्हटले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्या आईचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आले होते. त्यावेळी आमची विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी आम्ही त्यांना ऑफर दिली की, देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या. आमच्या ऑफरवर राजेश टोपे काहीच बोलले नाहीत, असेही जलील यांनी सांगितले. दरम्यान, आमच्यावर (एमआयएम) भाजपची बी टीम असल्याची नेहमीच टीका होते. आम्हाला ही टीका मान्य नाही. आम्ही थेट ऑफर देतो आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत. आमच्यासोबत या. पण खरे सांगायचे तर प्रत्येकाला फक्त मुस्लिम मते आवश्यक आहेत. बाकी काही नको. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे, असेही जलील म्हणाले. जलील हे एबीपी माझाशी बोलत होते. (हेही वाचा, 'महाविकास आघाडीचे 25 आमदार BJP च्या संपर्कात'; मंत्री रावसाहेब दानवे यांचा गौप्यस्फोट)

शवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी सरकार सत्तेत आले. त्याला आता दोन वर्षे झाली. मात्र 105 आमदारांचे संख्याबळ असलेला भाजप विरोधी पक्षात आहे. त्यामुळे भाजप दोन वर्षांपासून नेहमीच सांगत आला आहे की, महाविकासआघाडी सरकार आज ना उद्या पडणार आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी सरकार पडण्याचे नवनवे मुहूर्तही अनेक वेळा दिले आहेत. मात्र, महाविकासआघाडी सरकार स्थिर आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात एमआयएम या पक्षाचा एक खासदार, दोन आमदार आणि 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे एमआयएमची ही ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? एमआयएमने राष्ट्रवादीला दिलेली ऑफर हिंदुत्ववादी शिवसेनेच्या पचनी पडणार का याबाबतही मोठी उत्सुकता आहे.