IPL Auction 2025 Live

Milind Deora Joins Shiv Sena: मिलिंद देवरा यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश

कॉंग्रेस सोबतचे 55 वर्षांचे संबंध तोडून ते आता शिवसेनेत दाखल झाले आहेत.

milind deora | Twitter

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत आज (14 जानेवारी) माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी 'वर्षा' बंगल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 25 पदाधिकारी देखील होते. यावेळी मीडीयाशी बोलताना मनातील भावना देखील बोलून दाखवल्या आहेत. आज सकाळी त्यांनी ट्वीट करत राजीनाम्याची माहिती दिली. हा महाराष्ट्र कॉंग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. कॉंग्रेसकडून  समोर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये  देवरांच्या राजीनाम्यावर नेत्यांनी  नाराजी व्यक्त केली आहे.

आज कॉंग्रेसने मोदी सरकार विरूद्ध ‘भारत जोडो न्याय यात्रा' सुरू करत आहेत. अशा दिवशी देवरांच्या राजीनाम्याची घोषणा झाली आहे. जयराम रमेश यांनी यावर बोलताना 'राजीनाम्याची वेळेचं टायमिंग मोदींनी साधल्याचं' म्हटलं आहे. तर वर्षा गायकवाड यांनी 55 वर्षांचा संबंध तुटल्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा यांनी आधी सिद्धिविनायकाचं आणि नंतर कुलाबा परिसरामध्ये बाळासाहेबांच्या पुतळ्याचेही दर्शन घेतलं आहे. Milind Deora Quits Congress: 'मी विकासाच्या मार्गावर जात आहे' कॉंग्रेसला सोडचिठ्ठीनंतर मिलिंद देवरा यांची पहिली प्रतिक्रिया (Watch Video) .

पहा ट्वीट

मिलिंद देवरा यांनी का सोडली कॉंग्रेस?

मिलिंद देवरा यांनी आपण कधी कॉंग्रेस सोडू असं वाटलं नव्हतं. पण आता अखेर 55 वर्षांचे संबंध मी संपवत आहे. आता एकनाथ शिंदेंसोबत काम करणार आहे. त्यांची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं भव्य व्हिजन आहे. आता शिवसेनेसोबत जाऊन त्यांचे हात बळकट करत असल्याचं मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी मुरली देवरा आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. पक्षाला प्रामाणिकपणे वाढवण्यासाठी प्रयत्नशीर राहणार असल्याचं मिलिंद देवरा यांनी शिवसैनिकांना म्हटलं आहे.

मिलिंद देवरा हे मुरली देवरा यांचे चिरंजीव आहेत. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचा सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहरा अशी त्यांची ओळख होती. मिलिंद देवरा 15 व्या लोकसभेतील सर्वात तरुण सदस्य होते. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी मिलिंद देवरा खासदार झाले होते. 2004 च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या जयवंतीबेन मेहता विरुद्ध 10 हजार मतांच्या फरकानं हरवलं होतं. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत देवरा पुन्हा मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडून आले होते. 2019 साली लोकसभा निवडणूक शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी लढवली आणि मोठ्या मताधिक्यानं जिंकली.