नांदेड, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; घरांना तडे, नागरिक रस्त्यावर
यासोबत प्रगती आणि विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्वागवर जे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळेही निसर्गात मोठे बदल होत आहेत. भूकंप हा या बदलाचा देखील परिणाम असू शकतो, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Earthquake in Nanded Yavatmal District: विदर्भ आणि मराठवाड्यातील नांदेड (Nanded), अमरावती (Amravati) आणि यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जणवले. हा भूकंप 3.9 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. भूकंपाचा कालावधी 8 ते 10 सेकंद इतका होता. भूकंपाच्या धक्क्यामुळे घराच्या भिंती आणि खिडक्यांची तावदानं फुटली. तर नागरिकांमध्ये एकच घबराट उडाली. भूकंपाच्या धक्क्यानंतर प्रशासन जोरदार कामाला लागले असून, सावधगिरी बाळगताना दिसत आहे.
कुठे-कुठे भूकंपाचे धक्के?
जिल्हा | तालुका | नुकसान |
नांदेड | किनवट, माहूर | किरकोळ |
यवतमाळ | महागाव, फुलसावंगी, उमरखेड | घरांच्य भिंतींना तडे, |
(हेही वाचा, Palghar Earthquake Tremors: पालघर परिसरात पुन्हा 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप, 24 तासात पाचवा धक्का)
दरम्यान, भूगर्भातील हालचालींमुळे अशा प्रकारचे धक्के बसू शकतात. यासोबत प्रगती आणि विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्वागवर जे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळेही निसर्गात मोठे बदल होत आहेत. भूकंप हा या बदलाचा देखील परिणाम असू शकतो, असे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.