No Midnight Mass in Mumbai: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील चर्चमध्ये मध्यरात्री प्रार्थना केली जाणार नाही; नागरिकांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष रात्री 10 च्या अगोदर साजरे करावे लागणार

नागरिकांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष रात्री 10 च्या आधी साजरे करावे लागणार आहे.

Christmas mass (PC - Wikipedia.org)

No Midnight Mass in Mumbai: नाताळच्या पूर्वसंध्येला 24 डिसेंबरला मध्यरात्री सर्व चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. यासाठी ख्रिश्चन बांधव मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असतात. मात्र, यंदा करोनामुळे मुंबईत मध्यरात्रीची प्रार्थना केली जाणार नाही. नागरिकांना ख्रिसमस आणि नवीन वर्ष रात्री 10 च्या आधी साजरे करावे लागणार आहे. कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2020 रोजी रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत रात्र कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे यावर्षी ख्रिसमसच्या सणानिमित्त हा मोठा बदल करण्यात आला आहे.

दरवर्षी 24 डिसेंबरला ख्रिसमस रात्री 10 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत किंवा मध्यरात्रीपर्यंत साजरा केला जात असे. या दिवशी ख्रिश्चन बांधव मध्यरात्री चर्चमध्ये प्रार्थना करत. तसेच दरवर्षी 31 डिसेंबरला ख्रिश्चन समाजातील लोक संध्याकाळी 8 वाजता ते रात्री 10 वाजता नवीन वर्षाची प्रार्थना करण्यासाठी चर्चला जात असतं. परंतु, यावर्षी शहरातील सर्व चर्च रात्री 10 वाजण्यापूर्वी बंद करण्यात येणार आहेत.

सेंट पीटर चर्च, वांद्रे पश्चिम येथील रहिवासी फ्रॅझर फ्रेजर मस्करेन्हास यांनी सांगितलं की, “आम्ही 24 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता आणि रात्री 9 वाजता ख्रिसमसच्या दोन समूहाचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. नवीन वर्षाचा समूह रात्री 8 वाजता होईल. जेणेकरून आम्ही सेवा पूर्ण करू शकू. त्यानंतर शहरात नाईट कर्फ्यू पाळला जाईल. " (हेही वाचा - Mumbai Police Raids On Dragonfly club: सुरेश रैना, सुसान खान यांच्यासह 34 जणांवर गुन्हे दाखल)

याव्यतिरिक्त, यावर्षी, ख्रिश्चन समाजातील लोकांना केवळ आमंत्रण आणि नोंदणीद्वारे ख्रिसमसच्या प्रार्थना कार्यक्रमात उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल. बोरिवली पश्चिमेस अवर लेडी ऑफ इम्माक्युलेट कॉन्सेप्ट (आयसी) चर्चचे युवा नेते ऑर्नेलियस साल्दन्हा म्हणाले, "ज्या लोकांना मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे. त्यांनी नाताळ आणि नवीन वर्षाच्या मासला उपस्थित राहण्यासाठी एक कूपन नोंदणी करणे आवश्यक आहे. लोक विभागीय नेत्यांकडे नोंदणी करू शकतात."

फ्रेजर मस्करेन्हास यांनी सांगितलं की, "आम्ही लोकांना नावनोंदणी करण्यास सांगितले आहे आणि त्यानुसार ख्रिसमस आणि न्यू इयर माससाठी आमंत्रणे पाठविली आहेत. अशा प्रकारे, आपल्याकडे मर्यादित संख्येने लोक असतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी टाळता येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही चर्चमध्ये 65 वर्षे आणि 10 वर्षांखालील लहान मुलांना बंदी घातली आहे."

दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नियमांचे आणि उपाययोजनांचे अनुसरण मुंबईच्या सर्व चर्चद्वारे केले जाईल, असे बॉम्बेच्या आर्चिडिओसीझचे प्रवक्ते फ्रि निजेल बॅरेट यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ख्रिसमस आणि न्यू इयरसंदर्भातील सर्व सामुहिक सेवा रात्री दहाच्या आधी मुंबईतील सर्व चर्चांमध्ये संपवल्या जातील.