MHT CET Result 2020: महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्टचा निकाल लवकरचं होणार जाहीर; cetcell.mahacet.org वर अशा पद्धतीने करा चेक
त्यामुळे अधिकृत पोर्टल cetcell.mahacet.org किंवा mhtcet2020.mahaonline.gov.in वर निकाल जाहीर करण्यात येतील.
MHT CET Result 2020: महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (State Common Entrance Test Cell, Maharashtra) लवकरचं कॉमन एन्ट्रन्स टेस्ट 2020 चा निकाल (Common Entrance Test 2020) जाहीर करणार आहे. त्यामुळे अधिकृत पोर्टल cetcell.mahacet.org किंवा mhtcet2020.mahaonline.gov.in वर निकाल जाहीर करण्यात येतील. मात्र, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला भेट देऊन यासंदर्भात माहिती घेणं गरजेचं आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्यांचा रोल नंबर आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर एमएचटी सीईटी 2020 चा निकाल पाहता येईल.
कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी 'या' पद्धतीचा अवलंब करा -
स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल, महाराष्ट्रतर्फे घेण्यात येणाऱ्या कॉमन एन्ट्रन्स टेस्टच्या परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना आधी अधिकृत संकेतस्थळ Mhtcet2020 mahaonline gov.in वर जावे लागेल. यानंतर, आपल्याला मुख्यपृष्ठावर दिसणार्या MHT CET निकाल या ऑपशनवर क्लिक करावे लागेल. यानंतर, तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करावा लागेल. यानंतर Search टॅबवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला MHT CET 2020 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. यानंतर तुम्ही सीईटी निकाल पीडीएफ फाईल म्हणून डाउनलोड करू शकता. या निकालाची तुम्ही प्रिंट आउटदेखील काढू शकता. (हेही वाचा - Colour-Coded E-Pass: मुंबई लोकल मध्ये गर्दीचं नियोजन करण्यासाठी 'कलर कोडेड ई पास' यंत्रणेचा होतोय विचार; जाणून घ्या काय आहे हा पर्याय!)
एमएचटी सीईटी निकाल 2020 मध्ये विषयानुसार उमेदवारांची संपूर्ण माहिती आणि एकूण टक्केवारी गुणांचा समावेश असेल. याशिवाय सेल एमएचटी सीईटी निकाल 2020 च्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादीदेखील तयार करेल. पीसीबी ग्रुपसाठी एमएचटी सीईटी परीक्षा 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 12, 13, 14, 15, 16, 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. त्याचबरोबर, निकाल जाहीर झाल्यानंतर काउंसिलिंग शेड्यूलदेखील जाहीर केले जाईल. त्यानुसार, तीन फेऱ्यांमध्ये काउंसिलिंग घेण्यात येणार आहे. यावेळी काउंसिलिंग प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन होणार आहे.