IPL Auction 2025 Live

MHADA Recruitment 2019: म्हाडामध्ये लवकरच होणार 534 कर्मचाऱ्यांची मेगाभरती !

म्हाडा प्राधिकरणामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामे, इत्यादीसाठी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे म्हाडाने आपले मनुष्यबळाची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तसेच म्हाडामध्ये गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम कारणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्याचाही निर्णय घेतला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : PTI)

MHADA Recruitment 2019: म्हाडामध्ये लवकरच 534 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. म्हाडा प्राधिकरणामध्ये गृहनिर्माण प्रकल्प, लॉटरी पात्रता पडताळणी, पुनर्विकास योजना, संक्रमण शिबिरांशी संबंधित कामे, इत्यादीसाठी कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे म्हाडाने आपले मनुष्यबळाची वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. तसेच म्हाडामध्ये गेल्या काही वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम कारणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्याचाही निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या या मेगाभरतीमुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध मिळणार आहे. सध्या म्हाडाच्या विविध विभागामध्ये 706 जागा रिक्त आहेत. त्यामुळे म्हाडा प्राधिकरणाकडून लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. (हेही वाचा - MHADA Pune Board Lottery 2019: पुणे, पिंपरी चिंचवड मधील 2190 घरांसाठी सोडत निकाल आज 10 वाजता होणार जाहीर; lottery.mhada.gov.in वर पहा भाग्यवंतांची यादी!)

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे म्हाडामधील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया रखडली होती. परंतु, राज्यात सरकार स्थापन झाल्यामुळे आता म्हाडा भरती प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बैठकीत भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. (हेही वाचा - जाणून घ्या म्हाडाची घरे मिळवण्याची नक्की काय आहे प्रक्रिया, कोण होऊ शकते या लॉटरीमध्ये सहभागी)

MHADA Recruitment 2019: म्हाडामध्ये लवकरच होणार 534 कर्मचाऱ्यांची मेगाभरती Watch Video

गेल्या अनेक वर्षांपासून म्हाडाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. यावर उपाय म्हणून म्हाडाने कंत्राटी पद्धतीने हंगामी तत्त्वावर कामगार आणि कर्मचारी यांची भरती केली आणि त्यांच्याकडून कमी पगारा काम घेतले. या कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार आणि भत्तेही मिळत नव्हते. परंतु, म्हाडाने या कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यासाठी या कर्मचाऱ्यांना म्हाडाच्या अटी व शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे.