MHADA Pune Lottery Draw Result 2024: म्हाडा पुणे विभागातील घरांची लॉटरी housing.mhada.gov.in वर पहा ऑनलाईन!
housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल.
पुण्यामध्ये (Pune) 4777 घरांसाठी लवकरच सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर मधील घरांसाठी लॉटरी 8 मे 2024 दिवशी निघणार होती परंतू काही दिवसांपूर्वी अर्जाला मुदतवाढ दिली असल्याने 8 मे चा निकाल आता पुढे गेला आहे. म्हाडा च्या पुणे विभागीय मंडळाची नवी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. परंतून जेव्हा म्हाडाच्या सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे तेव्हा तो देखील ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध असणार आहे. housing.mhada.gov.in वर ऑनलाईन तर गृहनिर्माण भवन, आगरकर नगर, म्हाडा कार्यालय पुणे इथे ऑफलाईन निकाल जाहीर होणार आहे.
म्हाडा च्या पुणे विभागामध्ये 4882 घरांसाठी सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये निकाला दिवशी दुपारी 3 वाजल्यापासून माहिती पुस्तिका ऑनलाईन उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे. housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Draw Result चा पर्याय निवडून तुमचा अॅप्लिकेशन नंबर टाका. निकालाच्या दिवशी तुमचं स्टेटस पहायला मिळेल. भाग्यवान विजेत्यांसोबतच प्रतिक्षा यादी मध्ये असलेल्या अर्जदारांची माहिती दिली जाणार आहे.
म्हाडा पुणे विभागीय मंडळाच्या तारखा
अर्ज करण्याला 30 मे पर्यंत मुदतवाढ
ऑनलाईन पेमेंटची अंतिम तारीख 31 मे 2024
पात्र उमेदवारांची यादी 18 जून दिवशी जाहीर होईल
घरांची सोडत तारीख - अद्याप जाहीर नाही
म्हाडा मध्ये पुणे विभागात 2416 घरं ही प्रथम येणार्यास प्राधान्य तत्त्वावर दिली जाणार आहेत. तर अन्य विविध स्कीम मध्ये 18 घरं आहेत. प्रधानमंत्री आवास योजना मध्ये 59 आणि प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) PPP मध्ये 978 घरं उपलब्ध आहेत. 20% scheme मध्ये पीएमसी ची 745 आणि पिंपरी चिंचवड ची 561 घरं उपलब्ध आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2024 10:17 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

