MHADA Pune Lottery 2022: म्हाडा पुणे विभागाची 29 जुलैला 5069 घरांसाठी सोडत होणार जाहीर; lottery.mhada.gov.in वर करा अर्ज
काल(9 जून) पासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
म्हाडाच्या पुणे विभाग मंडळाकडून घरांच्या सोडतीसाठी तारीख जाहीर केली आहे. 29 जुलै 2022 दिवशी पुण्यात ही सोडत जाहीर होणार आहे. यामध्ये पुणे,सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घरांचा समावेश असणार आहे. दरम्यान पुणे म्हाडा विभाग मंडळाकडून सुमारे 5069 घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. काल(9 जून) पासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थातच lottery.mhada.gov.in यावर अधिक माहिती, नियमावली उप्लब्ध करून दिली जाणार आहे. 9 जून ते 9 जुलै असा महिनाभराचा नोंदणीचा कालावधी म्हाडाच्या पुणे विभागातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहे. तर नोंदणीकृत अर्जदार आज 10 जूनपासून 10 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत आपला अर्ज सादर करू शकतात. 11 जुलै ही ऑनलाईन रक्कम जमा करण्याची अंतिम मुदत असेल तर सोडतीसाठी स्वीकृती अर्जांची अंतिम यादी 21 जुलैला संध्याकाळी 6 वाजता अधिकृत वेबसाईट्स वर जाहीर केली जाणार आहे.
म्हाडाच्या सोडतीमध्ये 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण 1945 घरांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील 575, पिंपरी चिंचवड मधील 1370 घरांचा समावेश आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 279 सदनिका, प्रधानमंत्री आवास योजनेतील 170 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. MHADA Lottery 2022: म्हाडाच्या घरांसाठी मुंबईत दिवाळी मध्ये तर पुणे विभागातही लवकरच जाहीर होणार सोडत .
दरम्यान म्हाडा कडून नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून आधीच खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यामध्ये म्हाडा कडून कोणतेही प्रॉपर्टी डिलर्स, एजंट्स नेमण्यात आलेली नाही त्यामुळे असा दावा करणार्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत माहिती शेअर करणं, आर्थिक व्यवहार करणं टाळा असं सांगण्यात आले आहे.