MHADA Pune Board Lottery 2022: दिवाळीत घर खरेदीसाठी म्हाडा पुणे विभागीय मंडळाचा 20 ऑक्टोबरला सोडत शुभारंभ; पहा घरं कुठे?
यंदा दिवाळीमध्ये सुमारे 4 हजारांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात होणार आहे.
पुणे विभागात म्हाडाचं घर (MHADA Pune Board) घेण्याचं स्वप्न असणार्यांसाठी खूषखबर आहे. म्हाडा कडून यंदा दिवाळीमध्ये सुमारे 4 हजारांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात होणार आहे. 'झी 24 तास' च्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबर दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृह निर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते म्हाडाच्या पुणे विभागाच्या सोडतीचा शुभारंभ केला जाणार आहे. यामध्ये पुणे (Pune), पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchawad), सोलापूर (Solapur) मध्ये घर उपलब्ध असणार आहेत.
म्हाडाच्या पुणे विभागातील यंदाच्या सोडतीचं एक वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये शहरातील नामांकित बिल्डरांच्या प्रोजेक्टमधील घरांचा देखील समावेश असणार आहे. एकूण 3930 घरांसाठी ही म्हाडाकडून सोडत काढली जाणार आहे. मागील 2 वर्षामध्ये पुणे विभागात 27,118 घरांसाठी सर्वसामान्यांचं स्वप्न वास्तवात उतरलं आहे. तर यासाठी सुमारे 7 लॉटरी काढण्यात आल्या होत्या. हे देखील नक्की वाचा: MHADA Lottery च्या प्रक्रियेमध्ये बदल; अर्ज भरतानाच करावी लागणार कागपत्रांची सारी पूर्तता.
पुणे विभागासाठी 20 ऑक्टोबर 2022 पासून नोंदणी सुरू होणार आहे. 21 ऑक्टोबर पासून अर्ज स्वीकारले जातील तर सारी पडताळणी करून 15 डिसेंबर 2022 दिवशी सोडत जाहीर केली जाणार आहे. पुणे म्हाडा कडून 11 ऑनलाईन सोडती काढण्याचा मानस आहे.