MHADA Mumbai Board Lottery 2019: मुंबई मध्ये 217 म्हाडा घरांसाठी 2 जूनला निघणार लॉटरी; lottery.mhada.gov.in वर जाहीर होणार विजेत्यांची यादी
आता घराचे भाग्यवान विजेते आणि प्रतिक्षा यादीची माहिती म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर 2 जूनच्या संध्याकाळी 6 वाजता जाहीर केलं जाणार आहे.
MHADA House 2019 Mumbai Board Lottery: मुंबईमध्ये हक्काचं घर घेण्यासाठी तुम्ही यंदा म्हाडाचं घर घेण्यासाठी अर्ज केला असेल तर त्याची सोडत 2 जून 2019 ला जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणूक आणि निकाल यामुळे मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरातील घरांची लॉटरी पुढे ढकलण्यात आली होती. नाशिक पाठोपाठ आता मुंबई मध्ये म्हाडा घरांची लॉटरी निघणार यंदा मुंबईतील 217 घरांसाठी सोडत निघणार आहे. मग ही सोडत कशी, कुठे पहाल?
मुंबईतील 217 घरांसाठी सोडत
मुंबई म्हाडा घरं सोडत दिनांक - 2 जून 2019
वेळ - सकाळी 10 वाजल्यापासून
कुठे निघणार सोडत - म्हाडा भवन, वांद्रे
ऑनलाईन यादी पाहण्यासाठी - lottery.mhada.gov.in
30 मे दिवशी मुंबई म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली आहे. आता घराचे भाग्यवान विजेते आणि प्रतिक्षा यादीची माहिती म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर 2 जूनच्या संध्याकाळी 6 वाजता जाहीर केलं जाणार आहे. येथे पहा नाशिक शहरातील म्हाडा घरांचा निकाल
कशी पहाल भाग्यवान विजेत्यांची यादी
- lottery.mhada.gov.in ओपन करा.
- या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.
- मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.
- त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.
- तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.
अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच लॉटरी जनरेशन क्रमांक असेल. त्यापुढे पात्र अर्जदारांच्या कागदपत्राची छाननी केली जाईल तर अपात्र उमेदवारांना रिफंड दिले जाणार आहेत.