MHADA Exams: म्हाडाचे 29,30 जानेवारीच्या परीक्षा लांबणीवर; नव्या तारखा लवकरच

म्हाडाच्या वेबसाईट वर जाहीर प्रसिद्धीपत्रकामध्ये नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

MHADA Exams: म्हाडाचे 29,30 जानेवारीच्या परीक्षा लांबणीवर; नव्या तारखा लवकरच
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

म्हाडाच्या (MHADA) भरतीच्या परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्यानंटर नव्या तारखा म्हाडाने जाहीर केल्या होत्या पण 29,30 जानेवारीला राज्यात एमपीएससीच्या परीक्षा (MPSC Exams) देखील होत असल्याने म्हाडाकडून त्यांच्या 29,30 जानेवारीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. तर 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या परीक्षा पूर्वी प्रमाणे जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं जाहीर करण्यात आल्या आहे. MHADA Exam 2021 Revised Dates: म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा च्या नव्या तारख्या जाहीर; 1-15 फेब्रुवारी दरम्यान होणार परीक्षा.

म्हाडाच्या वेबसाईट वर जाहीर प्रसिद्धीपत्रकामध्ये नव्या तारखा लवकरच जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आले आहे. एमपीएससी राज्यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 29 जानेवारीला परीक्षा घेणार आहेत. दरम्यान या परीक्षेची तारीख न पडताळता म्हाडाने आपल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर 29 जानेवारीची म्हाडाची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे.

एमपीएससी च्या नव्या वेळापत्रकाप्रमाणे 2 जानेवारीला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 आता 23 जानेवारी 2022 दिवशी होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 आता 29 जानेवारी 2022 आणि महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2020 पेपर क्रमांक 2 पोलिस उपनिरीक्षक आता 30 जानेवारी 2022 ला होणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2022 09:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).