Nagpur Mercedes Crash: नागपूर मर्सिडीज अपघात प्रकरणातील चालक महिलेचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; याआधी कोर्टाने नाकारला होता अटकपूर्व जामीन

आता महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.

Police | (Photo credit: archived, edited, representative image)

Nagpur Mercedes Crash: नागपूर शहरात चार महिन्यांपूर्वी दारूच्या नशेत मर्सिडीज कार चालवत असताना एका महिलेने दोघांना उडवले (Nagpur Mercedes Accident)होते. आता महिलेने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्याबाबतची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. रितिका उर्फ ​​रितू मालू असे आरोपी महिलेचे नाव आहे. सोमवारी शहर पोलीस ठाण्यात महिलेची  चौकशी करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी औपचारिकपणे महिलेला अटक करण्यात आली.

गेल्या महिन्यात, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या महिलेला अटकपूर्व जामीन नाकारला होता. 'कोणताही विवेकी व्यक्ती दारूच्या नशेत गाडी चालवत नाही. त्या कृत्याला गंभीर गैरवर्तन असल्याचे म्हटले होते.' ही घटना 25 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये राम झुला पुलावर घडली. जेव्हा महिलेने दारूच्या नशेत तिची कार बेदरकारपणे चालवली आणि स्कूटरवरून आलेल्या दोघांना धडक दिली. मोहम्मद हुसैन गुलाम मुस्तफा आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद झिया हे दोघेही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. (हेही वाचा:Bapu Andhale Murder Case: सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी )

महिलेवर सुरुवातीला भारतीय दंड संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली रॅश ड्रायव्हिंग आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल आणि नागरिकाला दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर, सार्वजनिक आक्रोशानंतर आणि अपघाताची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी महिलेवर अतिरिक्त गुन्हेगारी आरोप लावले.