Bapu Andhale Murder Case: सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला.

Bapu Andhale Murder Case: सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी

सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale) खून प्रकरणी (Murder Case) चारही आरोपींना परळी न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आंधळे खून प्रकरणी (Bapu Andhale Murder Case) अटकेत असलेल्या चौघांना परळी प्रथमवर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. केज परिसरातून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांना अटक करून आज परळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही जणांना  दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.  दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि खून प्रकरणातील आरोपी बबन गीते (Babn Gite) अद्याप समोर आलेले नाहीत. ते अजूनही फरार आहेत.  (हेही वाचा - Liquor Policy Case: K Kavitha यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही; ED आणि CBI प्रकरणात फेटाळल्या जामीन याचिका)

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झालेल्या गोळीबारात एकजण जागीच ठार झाला होता, तर दोघे गंभीररित्या जखमी झाले होते.  परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. दरम्यान, या गोळीबारामध्ये मरळ वाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले होते.

बापू आंधळे हे मरळवाडीचे सरपंच म्हणून निवडून आले होते. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते. त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये. सरपंच बापू आंधळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता

(The above story first appeared on LatestLY on Jul 01, 2024 11:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).