Landslide Incident On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याच्या तिसऱ्या घटनेनंतर आज 2 तासांचा मेगा ट्रॅफिक ब्लॉक, Watch Video

तथापि, नुकत्याच केलेल्या तपासणीदरम्यान काही जाळ्यांची गुणवत्ता कमी असल्याचे आढळून आले, ज्यामुळे चांगल्या दर्जाची सामग्री वापरली जाईल याची खात्री करण्यासाठी नूतनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.

Landslide Incident On Mumbai-Pune Expressway (PC - Twitter)

Landslide Incident On Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) पावसाळा सुरू झाल्यानंतर गुरुवारी तिसऱ्यांदा दरड कोसळल्याची घटना घडली. कामशेत बोगद्याजवळ ही घटना घडल्याने दोन तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला. याठिकाणी मातीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. रात्री आठच्या सुमारास दरड कोरळल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाला.

दरड आणि भूस्खलनाच्या वारंवार उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आज दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक किवळा येथून वळवून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने मार्गस्थ करण्यात येईल. लोणावळ्याजवळील एक्स्प्रेस वेवर प्रवासी पुन्हा जोडले जातील. मात्र, या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे. या ब्लॉकचे उद्दिष्ट कामशेत बोगद्याजवळील मोकळी झालेली दरड काढून टाकणे हे आहे. (हेही वाचा -मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवासी लटकला, हवेत तरंगला, व्हिडिओ व्हायरल)

यापूर्वी मुंबई मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ आणि लोणावळ्याजवळ अशाच घटना घडल्या होत्या. यापुढे भेगा आणि दरड कोसळू नयेत म्हणून पर्वतरांगांच्या संरक्षणासाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तथापि, नुकत्याच केलेल्या तपासणीदरम्यान काही जाळ्यांची गुणवत्ता कमी असल्याचे आढळून आले, ज्यामुळे चांगल्या दर्जाची सामग्री वापरली जाईल याची खात्री करण्यासाठी नूतनीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.