Mumbai Local Mega Block: देखभाल-दुरूस्तीच्या कामासाठी तीनही रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉग; तर पश्चिम मार्गावर 5 तासांचा जम्बो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान UP आणि DOWN हार्बर लाईन्सवर 11.00 ते 04.00 पर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल.
Mumbai Local Mega Block: सिग्नलिंग अपडेट्स आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसह दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी तीनही मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर 5 तासांचा जंबो ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, माहीम ते गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान हार्बर लाईन रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी रविवारी माहीम आणि गोरेगाव स्थानकादरम्यान UP आणि DOWN हार्बर लाईन्सवर 11.00 ते 04.00 पर्यंत पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधी दरम्यान, सर्व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) - वांद्रे - CSMT आणि CSMT/पनवेल - गोरेगाव - CSMT/पनवेल मध्य रेल्वेच्या हार्बर ट्रेन सेवा आणि चर्चगेट - गोरेगाव - चर्चगेट स्लो सेवा बंद राहतील.
मध्य रेल्वेवर रविवारी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत सेवा विस्कळीत -
रविवारी मध्य रेल्वेवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत रेल्वे सेवा विस्कळीत राहिल. सीएसएमटीवरून सकाळी 10.25 ते दुपारी 2.45 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात येईल. तथापी, ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. (हेही वाचा -Bihar: डीकपलिंग दरम्यान रेल्वे अपघात होऊन दोन डब्यात दबला गेला कर्मचारी; दुर्दैवी मृत्यू (Watch Video))
हार्बर लाइन मेगा ब्लॉक -
सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 या वेळेत वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.22 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन सेवा रद्द राहतील.