Bihar: डीकपलिंग दरम्यान रेल्वे अपघात होऊन दोन डब्यात दबला गेला कर्मचारी; दुर्दैवी मृत्यू (Watch Video)
बिहारमधील बरौनी जंक्शन येथे रेल्वे कर्मचारी अमर कुमार राव यांचा शंटिंग ऑपरेशन दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. लखनऊ-बरौनी एक्स्प्रेसमध्ये डीकपलींग दरम्यान अपघात झाला.
Bihar: बिहारच्या (Bihar) बेगुसराय जिल्ह्यातील बरौनी जंक्शन (Barauni Junction) येथे रेल्वे कर्मचारी अमर कुमार राव यांचा प्लॅटफॉर्म 5 वर शंटिंग ऑपरेशन दरम्यान एका अपघातात मृत्यू झाला. अमर कुमारलखनौ-बरौनी एक्स्प्रेस (क्रमांक 15204) डीकपल करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक ट्रेन मागे सरकली. त्यात अडकवून हा अपघात झाला. तेथे उपस्थित असलेल्यांनी अलार्म वाजवला. परंतु चालक ट्रेनमधून बाहेर आल्याने खूप उशीर झाला. यात अमर कुमार यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
दोन डब्यात दबला गेला कर्मचारी
लखनऊ-बरौनी एक्सप्रेस की शंटिंग के दौरान शंटमैन की दर्दनाक मौत
📍 बरौनी जंक्शन स्टेशन@spjdivn @drmdnr @RailMinIndia @bareilly_jn2222 @srdcmspj @MayurTalwar_ pic.twitter.com/bPecVYhklr
— Bhrigunath Sawarn (@Bhrigun20383308) November 9, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 09, 2024 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

