Coronavirus: 11 जून, सकाळी 10 वाजेपर्यंत कोरोना व्हायरस संदर्भात राज्याचा MEDD अहवाल काय सांगतो? राज्यासह देशात, जगात काय आहे स्थिती? घ्या जाणून
राज्याचाMEDD विभाग दररोज सकाळी 10 वाजता लोकल ते ग्लोबल अशा माहितीवर आधारीत असा एक अहवाल प्रसिद्ध करतो. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग आजच्या अहवालात काय सांगतो, घ्या जाणून.
MEDD Coronavirus Report pdf 11 June 2020: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि त्याची सध्यास्थीती याबाबत जाणून घेणे सध्याच्या परिस्थितीत अनेकांची गरज बनली आहे. प्रसारमाध्यमं, विविध संकेतस्थळे यांवर ही माहिती सहज उपलब्ध आहे. असे असले तरी, स्थानिक, प्रादेशिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील माहिती एका क्लिकवर अथवा एकत्र उपलब्ध होणे ही तशी कठीण बाब. परंतू, राज्याचा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (Medical Education and Drugs Department Maharashtra) ही समस्या सोडवतो. राज्याचा हा विभाग दररोज सकाळी 10 वाजता लोकल ते ग्लोबल अशा माहितीवर आधारीत असा एक अहवाल प्रसिद्ध करतो. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (MEDD) आजच्या अहवालात काय सांगतो, घ्या जाणून.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील सार्वजनिक आरोग्य विभाग हा अहवाल प्रसिद्ध करत असतो. या अहवालानुसार, जगात आतापर्यंत 7145539, भारतात 286579 तर महाराष्ट्रात 94041 इतके कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण सापडले आहत. सकाळी 10 वाजेपर्यंत जगात 105621, भारतात 9996 आणि महाराष्ट्रात 3254 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मृत्यूबाबत बोलायचे तर, जगभरात आतापर्यंत एकूण 408025, भारतात 8102 तर महाराष्ट्रात 3438 जणांचा मृत्यू झाला आहे. MEDD Coronavirus अहवाल 11 जून 2020 पीडीएफ .
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव वाढण्याची महाराष्ट्रातील वारंवारता (Frequency) अथवा ट्रेंड पाहता साधारण 1 फेब्रुवारी 2020 ते 4 एप्रिल 2020 पर्यंत कोरोना व्हायरस रुग्णवाढीचा दर साधारण कायम राहिला आहे. तो फारसा वाढताना दिसत नाही. दरम्यान, 4 एप्रिल 2020 ते 6 जून 2020 या काळात मात्र हा दर अधिक वाढल्याचे MEDD अहवाल दर्शवतो. (हेही वाचा, Coronavirus: 1918 मधील Influenza प्रमाणेच कोरोना विषाणू धोकादायक; होऊ शकतात 5-10 कोटी लोकांचे मृत्यू- The Lancet चा दावा)
MEDD अहवाल भारतातील कोरोना व्हायरस रुग्णसंख्या वाढीबाबत काय सांगतो? तर भारतात कोरोना व्हायरस रुग्ण सापडल्याच्या पहिल्या दिवसापासून ते साधारण 62 व्या दिवसापर्यंत कोरोना व्हायरस वाढीचा देशातील वेग स्थिर आहे. मात्र, 62 व्या दिवसापासून शेवटच्या अपडेट म्हणजे 132 व्या दिवसापर्यंत हा वेग मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसतो आहे.
दरम्यान, कोरना रुग्णांची तारीखवार, वयोगट, जिल्हावार, राज्यवार आकडेवारी, आलेख यासोबतच महाराष्ट्राने कोरोना व्हायरस रुग्ण शोधण्यासाठी केलेल्या चाचण्या, नमुने आणि त्याचा परिणाम (रिजल्ट) जाणून घेण्यासाठी MEDD अहवाल एकदा जरुर पाहा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)