Measles In Maharashtra: जानेवारी पासून महाराष्ट्रात गोवरचे 538 रूग्ण

गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे.

Measles (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्रामध्ये हळूहळू गोवर (Measles) ची साथ पसरत आहे. मुंबई (Mumbai) पाठोपाठ मालेगाव मध्येही बालकांमध्ये गोवर हा आजार आढळत आहे. दरम्यान डाटा नुसार, महाराष्ट्रामध्ये 538 गोवरचे रूग्ण आढळले आहेत तर 5445 संशयित रूग्ण आहेत. ही आकडेवारी यंदा जानेवारी महिन्यापासूनची आहे. मुंबई, ठाणे, पालघर प्रमाणे मालेगावातही रूग्ण आहेत. मालेगाव मध्ये 51 रूग्ण 131 संशयित रूग्ण आहेत. भिवंदी मध्ये 37 रूग्ण आणि 122 संशयित रूग्ण आहेत आणि ठाण्यात 28 रूग्ण आणि 180 संशयित रूग्ण आहेत. नाशिक, अकोला आणि यवतमाळ मध्येही तुरळक प्रमाणात गोवरचे रूग्ण समोर येत आहेत.

National Health Mission चे कमिशनर तुकाराम मुंडे यांनी मॉब व्हॅक्सिनेशनचे आदेश दिलेले आहेत. सार्‍या जिल्ह्यांमध्ये लहान मुलांना 30 नोव्हेंबरपूर्वी गोवरची लस द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गोवर हा आजार थेट जीवघेणा नसला तरीही त्यामध्ये गुंतागुंत आरोग्याला धोकादायक आहे. यामध्ये न्युमोनिया, डायरिया आणि encephalitis सारखे आजार होऊ शकतात. यामुळे मात्र जीवाला धोका होऊ शकतो. हे देखील नक्की वाचा: Measles Symptoms and Precautions: गोवरचा धोका वाढतोय! जाणून घ्या या संसर्गजन्य आजाराची लक्षणं आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणती घ्याल काळजी! 

गोवर हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. गोवर टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण करणे. मुलांना गोवरपासून वाचवण्यासाठी त्यांना गोवर लसीचे 2 शॉट दिले जातात. शरीरावर पुरळ येणे, अंगात ताप भरणे आणि डोळ्यांतून पाणी वाहणे अशी विविध लक्षणे दिसुन येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif