Matoshree-Hanuman Chalisa Row:  कारागृहातून सुटका होताच खासदार नवनीतर राणा थेट रुग्णालयात दाखल

कारागृहातून बाहेर पडताच त्या तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने काल (बुधवारी) जामीन केला होता.

नवनीत राणा रुग्णालयात (Photo Credit: PTI)

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची कारागृहातून आज (5 मे) सुटका झाली आहे. कारागृहातून बाहेर पडताच त्या तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टाने काल (बुधवारी) जामीन केला होता. त्यानंतर नवनीत राणा यांची आज भायखळा कारागृहातून सुटका झाली. त्यांचे पती रवी राणा हे सुद्धा काही वेळेताच कारागृहातून बाहेर पडणार आहेत. त्यांच्या सुटकेची प्रक्रिया अद्याप सुरुच आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Matoshree-Hanuman Chalisa Row) म्हणण्याच्या हट्टापायी त्यांना तुरुंगात जावे लागले होते.

कारागृहातून बाहेर पडताच प्रसारमाध्यमांनी नवनीत राणा यांना प्रतिक्रिया विचारली. यावर नवनीत राणा यांनीकोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले. प्रसारमाध्यमांकडे पाहून त्यांनी केवळ हात जोडले आणि त्या निघून गेल्या. वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, Hanuman Chalisa Row: आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांना जामीन मंजूर)

हनुमान चालिसा पटणाच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आक्रमक झाले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा या दाम्पत्याने केली होती. इतकेच नव्हे तर त्यासाठी ते हट्टालाच पेटले होते. त्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते. परिणामी मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या दाम्पत्यास स्थानबद्धतेची नोटीस दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या वेळी या दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरुनही गुन्हा दाखल करण्यात आला होता.