Coronavirus: माथाडी कामगारांचा 25 मार्चपर्यंत बंद; भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

परिणामी, भाजीपाला आणि जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट वावरत असताना आता माथाडी कामगारांनी येत्या 25 मार्चपर्यंत काम बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. परिणामी, भाजीपाला आणि जीवनाश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या महाराष्ट्रातील नागरिकांना आधीच कोरोना व्हायरसचा सामना करावा लागत आहे. यातच माथाडी कामगार आणि व्यापाऱ्यांनी जाहीर केलेल्या काम बंदमुळे राज्यातील नागरिकांना अधिक अडचणींना सामोरे जावा लागणार आहे. बाजार समितीमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याचे सांगत व्यापारी आणि माथाडी कामगारांनी 25 मार्चपर्यंत काम बंद ठेवणार असल्याची माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे, यात कांदा- बटाटा, मसाला, अन्न-धान्य, फळे आणि भाजीपाला बाजाराच्या आवाराबरोबर वाहतूक, धान्य, भाजीपाला, रेल्वे, लोह आणि स्टील, पेपर, कापड, कापूस आणि अन्य व्यवसायांतील व्यापाऱ्यांसर माथाडी कामगारांचा समावेश आहे.

कोरोना व्हारसरचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार महत्वाचे पाऊल उचलताना दिसत आहे. दरम्यान, दुकाने बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. मात्र, यातून जीवानाश्यक सेवा वगळण्यात आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्याची सूचना पणन संचालकांनी केल्या, मात्र बाजार समितीमध्ये योग्य सुविधा मिळत नसल्याचे सांगत व्यापारी आणि माथाडी कामगारांनी २५ मार्चपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले. कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्रातील नागरिकांना भाजीपाला मिळणे कठीण झाले आहे. यातच सलग 4 दिवस बाजार बंद राहिल्यास त्याचापरिणाम भाजीपाला, कांदा-बटाटा, फळे यांच्या पुरवठ्यावर नक्कीच होणार आहे. त्यामुळे बाजार समितीचे सर्व कामकाज बंद होणार असून मुंबई आणि उपनगरांना होणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे थांबणार आहे. हे देखील वाचा- Coronavirus Impact: पेट्रोल पंपाच्या वेळा बदलल्या; मुंबईत सकाळी 7 ते संध्याकाळी 7, तर पुण्यात 8 ते 4 मिळणार Petrol

महाराष्ट्रात माथाडी कामगारांची सर्वात मोठी संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष व माजी मंत्री शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी हा बंद पाळला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच 25 मार्चनंतर परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांच्या यादीत झपाट्याने वाढ होऊ लागल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif